मुलीच्या सासरच्यांसमोर जाऊ शकते लाज! सोनं खरेदी करताना 5 गोष्टी आधीच चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर 1 लाख 21 हजारांवर, चांदीचे 1 लाख 52 हजारांवर पोहोचले. फसवणूक टाळण्यासाठी हॉलमार्क, बिल, शुद्धता आणि कायदेशीरता तपासा.
सोन्याचे दर दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. 1 लाख 21 हजार रुपयांहून अधिक सोन्याचे दर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 1 लाख 52 हजार रुपयांच्या आसपास आहेत. अशावेळी असंच सोनं खरेदी करणं तर परवडणार नाही. तुम्ही मुलीच्या लग्नासाठी किंवा जावयासाठी सोनं खरेदी करत असाल तर मात्र जरा जपूनच, त्याचं कारण म्हणजे सोनं खरेदी करताना त्यामध्ये फसवणुकीचं प्रमाण वाढत चाललं आहे.
मुलीच्या सासरच्यांसमोर तुमची मान शरमेनं खाली जाऊ नये यासाठी सोनं खरेदी करताना काही गोष्टी कसोशिनं तपासून पाहाणं आवश्यक आहे. नाहीतर हे काय तुम्ही आम्हाला फसवलं हे सासरचे टोमणे मारतीलच, त्यामुळे सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते समजून घेऊया.
advertisement
सोनं आणि स्त्रीचं नातं
भारतीयांचे सोन्याशी असलेले नाते खूप जुने आणि भावनिक आहे. बाजारातील चढ-उतार असूनही, सोना आजही प्रत्येक घरात आढळतो आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आधारस्तंभ बनलेला आहे. अक्षय्य तृतीया, दिवाळी, धनत्रयोदशी यांसारख्या सणांमध्ये आणि खास करून लग्न समारंभात सोनं महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची किंमत (Value) तेव्हाच टिकून राहील, जेव्हा ते एकदम शुद्ध असेल. जर सोने भेसळयुक्त (मिलावटी) किंवा बनावट निघाले, तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे, सोन्याची खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
योग्य ज्वेलर्सची निवड आणि हॉलमार्क स्टॅम्प
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार सोने खरेदी करताना ग्राहकांची सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे विश्वासार्ह आणि जबाबदार ज्वेलर्स निवडण्याची. अनेकदा माहिती नसल्यामुळे ग्राहक फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांकडून खरेदी करतात, ज्यामुळे त्यांची आयुष्यभराची कमाई गमावण्याची भीती असते. यासाठी, सर्वप्रथम तुम्ही भारतीय मानक ब्यूरोद्वारे हॉलमार्क केलेले दागिने विकणाऱ्या विक्रेत्याची निवड करा आणि बाजारात त्यांची पत (साख) चांगली असल्याची खात्री करा. दागिने दुकानातून घेण्यापूर्वी त्यावर हॉलमार्क स्टॅम्प आहे की नाही, हे तपासा. हॉलमार्क स्टॅम्पमुळे तुम्हाला चांगले रीसेल मूल्य आणि विमा संरक्षण मिळते. तसेच, तुमचा विक्रेता राष्ट्रीय स्तरावर मंजूर प्रयोगशाळेचा वापर शुद्धता तपासण्यासाठी करतोय की नाही, हे देखील विचारा.
advertisement
बिल आणि कायदेशीर प्रक्रियेकडे लक्ष द्या
सोने खरेदी करताना केवळ सोन्याच्या शुद्धतेवर लक्ष देऊन चालणार नाही, तर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करणेही महत्त्वाचे आहे. विश्वासार्ह ज्वेलर्स तुम्हाला इनव्हॉइस , गॅरंटी कार्ड आणि सोन्याची शुद्धता दर्शवणारा असे रिपोर्ट देतात. इनव्हॉइसमध्ये सोन्याचा त्या दिवसाचा भाव, घडणावळ शुल्, वेस्टेज आणि कर यांसारख्या प्रत्येक भागाचा तपशील असणे आवश्यक आहे. तसेच, विक्रेत्याची स्पष्ट रिटर्न किंवा बायबॅक पॉलिसी आहे की नाही, आणि विक्री-पश्चात सेवा उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करा.
advertisement
बेकायदेशीर सोन्यापासून दूर राहा
मोठी रक्कम आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करताना, ते सोने कायदेशीर मार्गाने आलेले असावे, हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. विक्रेत्याने ते वैध स्त्रोतातून मिळवले आहे आणि योग्यरित्या बनवले आहे, याची खात्री करून घ्या. तुम्ही घेतलेले सोने काळ्या पैशातून, तस्करीतून आलेले किंवा बेकायदेशीर मार्गाने जमा केलेले नसावे. अनेकदा काही दुकानदार जुने किंवा अवैध सोने वितळवून नवीन दागिने बनवतात, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि कायदेशीर अडचणीत येण्याचा धोकाही असतो. असे रिपोर्ट, इनव्हॉइस, आणि सोन्याचा स्त्रोत काळजीपूर्वक तपासल्यास तुम्ही बनावट किंवा बेकायदेशीर सोने खरेदी करण्यापासून वाचाल.
advertisement
शुद्धता आणि किंमत समजून घ्या
सोन्याची किंमत केवळ त्याच्या वजनावर नाही, तर त्याच्या शुद्धतेवर आणि कॅरेटवर अवलंबून असते. जेवढे सोने शुद्ध, तेवढी त्याची किंमत अधिक असते. खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रकारचे सोने घेत आहात आणि त्याची किंमत कशी ठरते हे समजून घेणे आवश्यक आहे:
18 कॅरेट (18K): यात साधारणतः तीन-चतुर्थांश (3/4) सोने असते आणि उर्वरित धातूंचे मिश्रण असते. हे हलके असते आणि गुंतागुंतीच्या डिझाइनसाठी वापरले जाते.
advertisement
22 कॅरेट (22K): यात 91.6% शुद्ध सोने असते. हे पारंपरिक दागिन्यांसाठी आणि लग्नासारख्या मोठ्या समारंभांसाठी सर्वाधिक पसंत केले जाते.
24 कॅरेट (24K): हे जवळपास पूर्णपणे शुद्ध असते. दागिने बनवण्यासाठी ते खूप मऊ असल्यामुळे योग्य नसते, परंतु सोन्याच्या नाण्यांसाठी किंवा दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
आजच्या पिढीचा पर्याय: डिजिटल गोल्ड
भारतात सोने खरेदी करणे केवळ सण-समारंभापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते दीर्घकालीन गुंतवणूक आणि सुरक्षिततेचे साधन म्हणूनही पाहिले जाते. सोन्याची किंमत वेळेनुसार स्थिर राहते आणि दीर्घकाळात चांगला परतावा देते. अनेक पालक आपल्या मुलांसाठी वारसा म्हणून सोने ठेवतात. मात्र, आजकाल तरुण जोडपी आणि कुटुंबे 'डिजिटल गोल्ड' खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, कारण ते भौतिक सोन्याप्रमाणेच सुरक्षित आहे आणि गुंतवणुकीसाठी वापरण्यास सोपे आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करताना त्याची रीसेल आणि बायबॅक पॉलिसी तपासा, डिजिटल सर्टिफिकेट आहे की नाही याची खात्री करा आणि आपले सोने कोणत्या परवानाधारक कस्टोडियनकडे सुरक्षित ठेवले जाईल, याची माहिती घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 2:33 PM IST