सारखा टोल भरायची कटकट नाही, सरकार लवकरच आणणार स्मार्ट टोल टॅक्स कार्ड!

Last Updated:

ही योजना लवकर लागू करण्याच्या दृष्टीने नितीन गडकरी गांभीर्याने विचार करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

News18
News18
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझाचा वापर करावा लागणाऱ्या वाहनचालकांसाठी चांगली बातमी आहे. मंथली टोल टॅक्स स्मार्ट कार्ड सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. ही योजना संपूर्ण भारतभरात लागू करण्याचा केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे. हे स्मार्ट कार्ड देशातल्या सर्व टोल प्लाझांवर स्वीकारलं जाईल आणि कार्डधारकांना टोल टॅक्समध्ये सूटही मिळेल. सरकारच्या या उपक्रमामुळे खासकरून कमर्शियल वाहनं आणि एक्स्प्रेस-वेवरून वारंवार प्रवास करावा लागणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळू शकतो. ही योजना लवकर लागू करण्याच्या दृष्टीने नितीन गडकरी गांभीर्याने विचार करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
सरकार टोलवसुलीसाठी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे. हे स्मार्ट कार्ड कसं काम करेल याबद्दल माहिती घेऊ या. यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं, की जीएनएसएस सिस्टीम पूर्ण देशात लागू होण्यास आणखी काही वेळ लागेल. जीएनएसएस लागू झाल्यानंतर वाहनांमध्ये एक छोटं मशीन लावलं जाईल. गाडी टोल रस्त्यावरून चालल्यानंतर योग्य हिशेबानुसार हे मशीन टोलचं शुल्क कापून घेईल. सॅटेलाइट टोल सिस्टीममध्येही स्मार्ट कार्ड फीचर जोडलं जाईल. त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांचा टोल मंथली पासच्या आधारे कापला जाईल.
advertisement
मंथली पास घेणाऱ्यांना सध्याच्या टोल सिस्टीमनुसारच शुल्क द्यावं लागेल, की त्यांना कोणत्या प्रकारची सवलत द्यावी लागेल, याबद्दल मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही; मात्र स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत नियमित प्रवास करणाऱ्यांना निश्चितपणे टोल टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे स्मार्ट कार्ड खासकरून कमर्शियल वाहनांसाठी फायद्याचं ठरेल. कारण कमर्शियल वाहनं दूरच्या अंतराचा प्रवास करतात. यामुळे टोल भरण्याची प्रक्रिया सोपी तर होईलच; पण नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी खर्चात घटही होईल. सरकारच्या या योजनेवर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. ही योजना लागू होताच देशभरातल्या लाखो वाहनांना टोल टॅक्समध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनी/
सारखा टोल भरायची कटकट नाही, सरकार लवकरच आणणार स्मार्ट टोल टॅक्स कार्ड!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement