Market बंद होताच महाराष्ट्र सरकारसोबत डील फाइनल; सर्वांचे डोळे विस्फारले, उद्या बाजार ओपन होताच होणार फायरवर्क्स
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market News: हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 3,135 कोटी रुपयांचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानंतर आता उद्या शेअर बाजारात कंपनीच्या स्टॉकवर सर्वांची नजर असेल.
मुंबई: हरिओम पाईपने शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कंपनीने महाराष्ट्रातील गडचिरोली येथे स्टील प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत करार केला आहे.
3,135 कोटींचा प्रकल्प
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड (HPIL) ने गडचिरोली जिल्ह्यात एक इंटिग्रेटेड स्टील प्लांट सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या प्रकल्पात कंपनी एकूण 3,135 कोटी रुपये गुंतवणार आहे.
advertisement
सरकारची मदत आणि प्रकल्पाचे स्वरूप
कंपनीच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार सध्याच्या धोरणांनुसार आणि नियमांनुसार आवश्यक सवलती, परवानग्या आणि मंजुऱ्या मिळवण्यासाठी मदत करेल. या करारामध्ये कोणत्याही प्रकारची शेअरहोल्डिंग, संबंधित पक्षांचे व्यवहार किंवा नवीन शेअर्स जारी करणे समाविष्ट नाही. हा करार केवळ प्रस्तावित स्टील प्लांटपुरता मर्यादित असून यामुळे राज्य सरकारला कंपनीच्या संचालक मंडळात कोणाचीही नियुक्ती करण्याचा किंवा कंपनीच्या भांडवली रचनेत (capital structure) कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळालेला नाही.
advertisement
शेअर बाजारातील कामगिरी
शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना हरिओम पाईपचा शेअर 2.68 टक्के वाढून 555 रुपयांवर स्थिरावला. मात्र गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 23.20 टक्के घट झाली आहे.
advertisement
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 5:33 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Market बंद होताच महाराष्ट्र सरकारसोबत डील फाइनल; सर्वांचे डोळे विस्फारले, उद्या बाजार ओपन होताच होणार फायरवर्क्स