20 असो की 60 हजार रु पगार! हे 3 सुत्र कायम लक्षात ठेवा, महिन्याला खिसा कधीच होणार नाही रिकामा

Last Updated:

पगार कितीही असो, महिन्याच्या अखेरीस पैसे कमी पडतात. बचत, खर्चाचा हिशोब आणि छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करा. आर्थिक तज्ज्ञांच्या मते पगाराचा 20% हिस्सा बचतीसाठी ठेवावा.

News18
News18
पगार कितीही असो, 20 किंवा 60 किंवा 1 लाख महिन्याच्या अखेरीला मात्र बँक खात्यावर बोटावर मोजण्याऐवच पैसे उरतात किंवा कडकी येतो. मग अशावेळी उधारी घेणं, लोन काढणं किंवा अगदीच काटकसर करुन जगावं लागतं. ही वेळ तुमच्यावर येऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर 3 गोष्टींची गाठ आताच बांधून ठेवा. आजच्या धावपळीच्या जगात अनेकांच्या आयुष्याचं गणित पगार ते पगार असं झालं आहे.
महिन्याच्या सुरुवातीला पगार खात्यात जमा होतो, 10 दिवसांत तो संपायला सुरू होतो. महिनाअखेर हिशेब मांडला की उरते फक्त चिंता आणि पश्चाताप. तेव्हा वाटतं थोडे तरी पैसे आपल्याकडे हवे होते. मग असं होऊ नये यासाठी काय करायचं ते पाहुया.
आधी बचत, मग खर्च
बहुतेक लोक बचतीसाठी महिन्याच्या शेवटी काही रक्कम ठेवतात. पण हे सूत्र अपयशी ठरतं, कारण खर्च कधीच कमी होत नाहीत. त्यामुळे सूत्र उलट करा, पगार आल्यावर 50-30-20 अशा हिशोबाने रक्कम वेगवेगळी विभागून ठेवा. 50 टक्के रक्कम तुमच्या एका बँक खात्यावर उर्वरित 50 टक्के रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ठेवा.
advertisement
आर्थिक तज्ज्ञ सांगतात की कोणत्याही व्यक्तीने आपल्या पगाराचा किमान २० टक्के हिस्सा दरमहा बचत किंवा गुंतवणुकीसाठी ठेवावा. उदाहरणार्थ, पगार 30,000 रुपये असेल, तर त्यातील 6,000 रुपये वेगळे ठेवा. हे पैसे आरडी, पीपीएफ, एसआयपी किंवा व्हीपीएफ सारख्या सुरक्षित आणि फायदेशीर पर्यायांमध्ये गुंतवा. बचतीसाठी शिस्त ही तितकीच महत्त्वाची आहे. रोज बाहेर जेवण, ऑनलाईन सेल्सचा मोह, क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर, या सवयी बजेट बिघडवतात.
advertisement
खर्चाचा हिशोब सुरुवातीचे काही महिने लिहून काढा
आपण रोज हिशोब लिहिला की आपण किती वायफळ खर्च केला याचा अंदाज महिन्याच्या अखेरीस येतो. त्यामुळे तुम्ही तुमचे सगळे खर्च लिहायला सुरुवात करा. कुठे काटकसर करू शकतो याची एक लिस्ट तयार करा. बजेट तयार करा आणि त्याला कटाक्षाने पाळा. छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा. शेअर मार्केट धोक्याचं वाटत असेल तर गुंतवणुकीचे इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
advertisement
छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करा
SIP, म्युच्युअल फंड, PPF, आरडी, फिक्स डिपॉझिट सारखे पर्याय हे छोट्या सेविंगसाठी उत्तम आहेत. याशिवाय इमर्जन्सी फंड तुमच्याकडे थोडा तरी शिल्लक राहिला पाहिजे. अचानक आजारपण आलं तर तुमच्या हातात पैसे हवेत त्यामुळे त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. जर 20% पैसे वाचवू शकत नसाल कठीण वाटत असेल, तर 10% पासून सुरुवात करा. महत्त्वाचे हे आहे की, तुम्ही सुरुवात करा. हळूहळू जेव्हा तुमची सवय बनेल आणि उत्पन्न वाढेल, तेव्हा ते वाढवून 15% आणि नंतर 20% पर्यंत घेऊन जा.
advertisement
गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती?
गुंतवणूक करण्याची सर्वात चांगली वेळ 'आज' आहे. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला 'कम्पाउंडिंग'च्या शक्तीचा मिळेल. पगार आल्याच्या पहिल्या आठवड्यातच गुंतवणूक करणे ही सर्वोत्तम रणनीती आहे.
मराठी बातम्या/मनी/
20 असो की 60 हजार रु पगार! हे 3 सुत्र कायम लक्षात ठेवा, महिन्याला खिसा कधीच होणार नाही रिकामा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement