Success Story : 75 वर्षांपुर्वी सुरूवात, हस्तकला व्यवसायातून निर्माण केली परांजपे कुटुंबाने ओळख, वर्षाला लाखोंची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
हस्तकलेचा घरगुती व्यवसाय आता पुण्यातील परांजपे कुटुंबाची ओळख बनला आहे. तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवसायाने अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत केली आहे.
पुणे: आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी सुरू केलेला एक हस्तकलेचा घरगुती व्यवसाय आता पुण्यातील परांजपे कुटुंबाची ओळख बनला आहे. तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवसायाने अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत केली आहे. परांजपे कुटुंबाने तयार केलेल्या हस्तकला उत्पादनांना महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांच्या या व्यवसायाबद्दल ललिता परांजपे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
1950 सालापासून सुरू असलेला व्यवसाय
ललिता परांजपे यांनी सांगितलं की, 1950 साली आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंदाकिनी परांजपे यांनी भरतकामाबरोबरच पेंटिंगचे क्लासेस सुरू केले. सुरुवातीला काही जणींना शिकवण्यापासून सुरू झालेला हा उपक्रम हळूहळू वाढत गेला आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या व्यवसायाची तिसरी पिढी यशस्वीरित्या हा वारसा पुढे नेत आहे. तीन पिढ्यांपासून हा क्लास सातत्याने सुरू असल्याने, या व्यवसायावरच संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा आहे. या व्यवसायातून महिन्याला लाखभर उलाढाल होते.
advertisement
या भरतकाम क्लासने अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले आहेत. विशेष म्हणजे परांजपे कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारचा सोशल मीडियाचा मार्केटिंगसाठी वापर केला नाही. तरीही त्यांच्याकडे भरतकाम हस्तकला शिकण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दिवसांतून त्यांच्या 4 पेक्षा अधिक बॅच असतात. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना देखील राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मागणी असते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 22, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 75 वर्षांपुर्वी सुरूवात, हस्तकला व्यवसायातून निर्माण केली परांजपे कुटुंबाने ओळख, वर्षाला लाखोंची उलाढाल

