Nobel Prize Economic : 10.3 कोटी रुपये, सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र; अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार तिघांना जाहीर, ‘क्रिएटिव डिस्ट्रक्शन’ म्हणजे काय?

Last Updated:

Nobel Prize 2025 Economic: जोएल मोकीर, पीटर हॉविट आणि फिलिप एघियन यांना या वर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी दाखवून दिलं की सततचा इनोव्हेशन आणि क्रिएटिव डिस्ट्रक्शन हीच जगाच्या आर्थिक प्रगतीची खरी इंजिनं आहेत.

News18
News18
स्टॉकहोम: या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे जोएल मोकीर, अमेरिकेचे पीटर हॉविट आणि ब्रिटनचे फिलिप एघियन यांना मिळाला आहे. नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिले की "नवोन्मेष" (innovation) कसा आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा करतो. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांवर होतो. नवीन उत्पादने आणि उत्पादनाच्या नव्या पद्धती जुन्या पद्धतींना सतत बदलत असतात. आणि ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. हीच अखंड प्रक्रिया आर्थिक विकासाचा पाया आहे. ज्यामुळे जगभरातील लोकांचे जीवनमान, आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते.
advertisement
विजेत्यांना 11 मिलियन स्वीडिश क्रोना (सुमारे 10.3 कोटी रुपये), सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे पुरस्कार 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे प्रदान केले जातील.
लोकशाहीची नायिका मारिया कोरिना माचादो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार
इतिहासाच्या आधारे आर्थिक विकास कसा शक्य झाला हे स्पष्ट केले
advertisement
नोबेल समितीच्या माहितीनुसार, जोएल मोकीर यांनी इतिहासाचा अभ्यास करून दाखवले की अखंड आर्थिक विकास का शक्य झाला. त्यांनी सांगितले की जर नवीन शोध आणि सुधारणा सतत होत राहाव्यात, तर आपल्याला केवळ एवढे माहीत असणे पुरेसे नाही की एखादी गोष्ट कार्य करते, तर हे समजणेही गरजेचे आहे की ती का कार्य करते.
advertisement
भीतीच्या जगात कला जिवंत ठेवणारा लेखक; लास्जलो क्रास्नाहॉर्कईंना साहित्याचा नोबेल
औद्योगिक क्रांतीपूर्वी लोकांना हे नीट समजत नसे, त्यामुळे अनेक शोध आणि नवकल्पनांचा योग्य वापर करणे कठीण होते. त्याचबरोबर मोकीर यांनी सांगितले की समाजाने नवीन कल्पनांसाठी खुले असणे आणि बदल स्वीकारणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
1992 मध्ये ‘क्रिएटिव डिस्ट्रक्शनमॉडेल तयार केले
फिलिप एघियन आणि पीटर हॉविट यांनी सतत आर्थिक विकास कसा होतो हे समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1992 मध्ये एक प्रसिद्ध मॉडेल तयार केले. ज्याला ‘क्रिएटिव डिस्ट्रक्शन’ (रचनात्मक विनाश) असे नाव देण्यात आले.
advertisement
वाळवंटात पाणी देणाऱ्या अणूंच्या शोधाला ChemistryNobel;तिघा शास्त्रज्ञांचा सन्मान
या संकल्पनेचा अर्थ असा की जेव्हा एखादे नवीन आणि अधिक चांगले उत्पादन बाजारात येते, तेव्हा जुन्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या कंपन्या मागे पडतात. यात दोन गोष्टी घडतात पहिली म्हणजे ही प्रक्रिया रचनात्मक आहे कारण ती नवीन आणि उत्तम गोष्टी घेऊन येते; दुसरी म्हणजे ती विनाशकारी आहे कारण जुन्या तंत्रज्ञानाच्या कंपन्या स्पर्धेत हारतात.
advertisement
क्वांटमच्या जगात क्रांती, उलगडले विश्वाचे नवे रहस्य; तिघा वैज्ञानिकांना नोबेल
नोबेल विजेत्यांनी स्पष्ट केले की, अशा बदलांमुळे संघर्ष निर्माण होतात आणि त्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या कंपन्या आणि काही प्रभावशाली गट नवकल्पना आणि नवे विचार रोखू शकतात.
अर्थशास्त्राचा नोबेल दोन भारतीयांना 
अमर्त्य सेन (1998) गरिबी समजून घेण्याचा आणि मोजण्याचा नवीन दृष्टिकोन मांडला. दुष्काळ का होतात आणि लोकांचे कल्याण कसे वाढवता येईल, यावर संशोधन केले. उदाहरणार्थ: त्यांनी सांगितले की गरिबी फक्त पैशाने नाही तर शिक्षण आणि आरोग्याच्या आधारावरही मोजली जावी.
शरीर स्वतःवर का हल्ला करत नाही? या रहस्याचा उलगडा करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल
अभिजीत बॅनर्जी (2019) गरिबी हटवण्यासाठी लहान-लहान प्रयोग केले. उदाहरणार्थ: शाळांमध्ये मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल यावर संशोधन केले. गरीब मुलांना मोफत पुस्तके दिल्यास त्यांच्या शिक्षणावर किती परिणाम होतो हे त्यांनी तपासले. अभिजीत बॅनर्जी यांनी नोबेल पुरस्कार आपल्या पत्नी एस्थर डुफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासोबत शेअर केला होता.
1895 मध्ये नोबेल पुरस्कारांची स्थापना झाली
नोबेल पुरस्कारांची स्थापना 1895 मध्ये झाली आणि पहिला पुरस्कार 1901 मध्ये प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार वैज्ञानिक आणि शोधक अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्या मृत्यूपत्रानुसार देण्यात येतात. सुरुवातीला फक्त भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमध्येच नोबेल पुरस्कार दिले जात होते. नंतर अर्थशास्त्र या क्षेत्राचाही समावेश करण्यात आला. नोबेल पुरस्काराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कोणत्याही क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशन झालेल्या व्यक्तींची नावे पुढील 50 वर्षांपर्यंत गुप्त ठेवली जातात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Nobel Prize Economic : 10.3 कोटी रुपये, सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र; अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार तिघांना जाहीर, ‘क्रिएटिव डिस्ट्रक्शन’ म्हणजे काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement