वर्षाला 436 रुपये भरा आणि कुटुंब सुरक्षित करा, सरकारची योजना ठरतेय Life Saver

Last Updated:

सरकारची योजना ठरतेय ‘लाईफ सेवर’! वर्षाला 436 रुपये भरा आणि लाखो रुपयांचं कव्हर मिळवा!

News18
News18
प्रत्येक व्यक्ती आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुरक्षित असावं यासाठी धडपड करत असतो. मात्र आजकाल कधी काय घडेल याचा नेम नाही. आपल्या पश्चात कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी सरकारने खास योजना आणली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत वर्षाला 436 रुपये फक्त प्रीमियम भरायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑटो डेबिट पण करु शकता. प्रत्येक वर्षी तुम्ही 436 रुपये भरायचे आहेत. त्याचा फायदा तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे.
तुमचं बचत खातं बँक ऑफ महाराष्ट्रात असेल आणि तुमचं वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ तुम्ही घ्यायला हवा. (PMJJBY) वर्षाला 436 रुपये प्रीमियम भरून तुमच्या कुटुंबासाठी 2 लाखांचं जीवनविमा संरक्षण मिळवू शकता. ही योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि सोपी असून, कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय उपलब्ध आहे.
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुमचं जनधन खातं असणं आवश्यक आहे. ज्यांचं जनधन खातं आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय एक्सिडेंट इन्शुरन्सचा देखील फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही जर हे खातं उघडलं नसेल तर शक्य असल्यास आजच अकाउंट उघडा आणि ही योजना सुरू करून घ्या.
जीवन अस्थिर आहे आणि आपण कधी कोणत्या अडचणीत सापडू याचा नेम नाही. अशा वेळी, कुटुंबासाठी एक आर्थिक आधार ठेवणं गरजेचं ठरतं. याच विचारातून ही योजना राबवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी हे विमा संरक्षण सहज उपलब्ध करून देत आहे. या योजनेत प्रीमियम केवळ 436 रुपये भरायचा आहे. म्हणजे दिवसाला केवळ 1.20 रुपये भरायचे आहेत. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नोंदणीकृत नातेवाइकाला म्हणजेच नॉमिनीला 2 लाख रुपये विमा रक्कम त्याच्या खात्यावर मिळते. प्रीमियम तुमच्या खात्यातून दरवर्षी आपोआप वजा होतो. विसरण्याची शक्यता नाही.
advertisement
याशिवाय नव्याने खाते उघडणाऱ्यांसाठी देखील लगेच ह्या योजनेचा लाभ घेता येतो. कोणतीही वैद्यकीय तपासणी गरजेची नाही, योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेष वैद्यकीय कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट देऊन, मोबाईल बँकिंगद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे पीएमजेजेबीवायसाठी नोंदणी करू शकता. एकदा नोंदणी केल्यानंतर ही योजना दरवर्षी रिन्यू होऊ शकते, आणि तुमचं संरक्षण कायम राहतं.
advertisement
आजच जर तुम्ही तुमचं बँक खातं तपासून ही योजना सुरू केली, तर उद्याचा अनिश्चित काळ अधिक सुसह्य होतो. कारण अपघात, आजार किंवा नैसर्गिक संकटं कोणताही इशारा न देता येतात. पण तुमच्या नंतरही तुमच्या कुटुंबाची काळजी कोणी घेतंय, ही भावना फार मोठा आधार ठरते. बँक ऑफ महाराष्ट्रसारखी विश्वासार्ह सरकारी बँक ही योजना राबवत असल्यामुळे ग्राहकांना कोणतीही फसवणूक किंवा अडचण येत नाही. कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठीही ही योजना मोठ्या फायदेशीर ठरते. याशिवाय तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील जनधन खातं उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
मराठी बातम्या/मनी/
वर्षाला 436 रुपये भरा आणि कुटुंब सुरक्षित करा, सरकारची योजना ठरतेय Life Saver
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement