Indian Railway: तिकीट बुक करणं सोपं नाही! रेल्वेच्या नियमात 1 जुलैपासून बदल, काय आहेत 3 नवे नियम

Last Updated:

1 जुलै 2025 पासून रेल्वे तिकीट दरवाढ, तात्काळ बुकिंगसाठी आधार सक्ती आणि OTP ऑथेंटिकेशन लागू होणार आहे. प्रवाशांना या बदलांमुळे खर्च वाढणार असून बुकिंग प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

News18
News18
तुम्ही फिरायला जायचा, गावी जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंग करत असाल तर तुमचं नुकसान होऊ शकतं. जुलै महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांच्या खिशाला थेट फटका बसणार आहे. तिकीट दरवाढ, तात्काळ बुकिंगचे नियम कठोर आणि नवीन डिजिटल अटी हे सगळं 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. अनेक प्रवासी आधीच महागाईमुळे त्रस्त असताना, आता रेल्वे प्रवासावरही खर्च वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तिकीट दरामध्ये दरवाढ
रेल्वे मंत्रालयाने 2020 नंतर प्रवासी भाड्यांत वाढ जाहीर केली आहे. 1 जुलैपासून नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनसाठी प्रवास दरात 1 पैसे प्रति किलोमीटर तर एसी प्रवासासाठी 2 पैसे प्रति किलोमीटर दरवाढ होणार आहे. 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी मात्र दर जैसे थे राहणार आहेत. मासिक पास (MST) आणि शॉर्ट डिस्टन्स प्रवासावर याचा परिणाम होणार नाही. मात्र 500 किमीपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी किलोमीटरमागे एक पैशांची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
तात्काळ बुकिंगसाठी आधार सक्ती
तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अट घालण्यात आली आहे. 1 जुलैपासून IRCTC अॅप किंवा वेबसाइटवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन अनिवार्य असणार आहे. याचा थेट परिणाम अचानक प्रवास करणाऱ्या, गरजूंवर होणार आहे. तात्काळ तिकीटसाठी धावपळ करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे फटका बसू शकतो. तात्काळ विंडो तिकीटासाठी देखील ओरिजनल आधार कार्ड दाखवणं आणि ओटीपी देणं बंधनकारक असणार आहे.
advertisement
OTP शिवाय बुक होणार नाही तिकीट
तात्काळ बुकिंग प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा बदल 15 जुलैपासून लागू होईल. आता प्रत्येक तात्काळ बुकिंगवेळी आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर एक OTP ऑथेंटिकेशन सक्तीचं असणार आहे. OTP दिल्यानंतरच तिकीट बुक होणार आहे. याचा अर्थ, प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी मोबाइलवर येणाऱ्या OTP द्वारे आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. अन्यथा तिकीट बुक होणार नाही.
advertisement
बुकिंग एजंटांवरही निर्बंध
तात्काळ बुकिंग सुरु होण्याच्या पहिल्या 30 मिनिटांत कोणताही एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. AC क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30, तर नॉन-AC साठी 11 ते 11.30 या वेळेत केवळ सामान्य प्रवासीच बुकिंग करू शकतील. या सर्व बदलांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये चिंता आहे. आधीच तिकीट मिळवणं कठीण, प्रवास करणं या बदलांमुळे थोडं किचकट झालं आहे. रेल्वे प्रशासनाकडून मात्र यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि तात्काळ बुकिंगमधील फसवणुकीला आळा घालण्याचा हेतू असल्याचा दावा करण्यात आला आहे. जुलैपासून प्रवास करायचा असेल तर नवे नियम समजून घ्या नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं अशा सूचना रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Indian Railway: तिकीट बुक करणं सोपं नाही! रेल्वेच्या नियमात 1 जुलैपासून बदल, काय आहेत 3 नवे नियम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement