Success Story : घरून सुरू केलेल्या फराळ व्यवसायानं दिलं यश, सारिका सोळंके महिन्याला कमावतात 30 ते 35 हजार रुपये

Last Updated:

सारिका यांना गृहिणी असताना काहीतरी वेगळं करायचं होतं. स्वयंपाकाची त्यांना आधीपासूनच आवड असल्याने त्यांनी ठरवले की, आपण फराळाचा व्यवसाय सुरू करूया.

+
फराळाचा

फराळाचा व्यवसाय तून सारिका कमवतात चांगल उत्पन्न 

अपूर्वा तळणीकर-प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :
प्रत्येक महिलेला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, ज्याच्या माध्यमातून ती आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकेल. याच इच्छेने छत्रपती संभाजीनगरच्या सारिका सोळंके यांनी स्वतःचा फराळ व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या मेहनतीमुळे, आज त्या महिन्याकाठी चांगलं उत्पन्न कमवत आहेत.
सारिका सोळंके या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. त्यांचे पती नोकरी करतात, पण सारिका यांना गृहिणी असताना काहीतरी वेगळं करायचं होतं. स्वयंपाकाची त्यांना आधीपासूनच आवड असल्याने त्यांनी ठरवले की, आपण फराळाचा व्यवसाय सुरू करूया. त्यांनी 2016 साली या व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातून तीन महिन्यांचा कुकिंग कोर्स केला.
advertisement
या क्लासमुळे त्यांना विविध फराळाचे पदार्थ बनवण्याची माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनी चकलीची भाजणी करून विकली. हळूहळू त्यांनी व्यवसाय वाढवला आणि सध्या चकली, बालुशाही, गुलाबजाम, चिवडा, बेसन लाडू, मोतीचूरचे लाडू असे विविध पदार्थ विकतात.
त्याचबरोबर शहरातील अनेक स्वीट मार्टमध्ये गुलाब जामुन आणि बालुशाही पुरवतात. या व्यवसायामुळे सारिका महिन्याला साधारणतः 30 ते 35 हजार रुपये कमवतात. विशेष म्हणजे दिवाळीमध्ये त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होते.
advertisement
सारिका म्हणतात की, व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणी आल्या, अनेकांनी त्यांना नाव ठेवले, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या पतीने त्यांना खूप मोठी साथ दिली, ज्यामुळे आज त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यशस्वीतेचा हा प्रेरणादायी प्रवास अन्य महिलांना त्यांच्या व्यवसायाची स्वप्नं पूर्ण करण्यास प्रोत्साहित करतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : घरून सुरू केलेल्या फराळ व्यवसायानं दिलं यश, सारिका सोळंके महिन्याला कमावतात 30 ते 35 हजार रुपये
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement