Share Market: मार्केट ट्रेडिंगमध्ये होणार मोठी उलथापालथ, कमी पैशात जास्त शेअर्स ट्रेड करता येणार

Last Updated:

Cash Market: कॅश सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी SEBI मोठा बदल करण्याच्या तयारीत असून लवकरच मार्जिन कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे कमी भांडवलात जास्त ट्रेडिंग करता येणार असून कॅश मार्केटला मोठी गती मिळू शकते.

News18
News18
मुंबई : जर तुम्ही शेअर बाजारात कॅश सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर येऊ शकते. शेअर बाजार नियामक सेबी (SEBI) आता कॅश ट्रेड्सवर लागू होणारा मार्जिन कमी करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता कमी भांडवलात अधिक शेअर्स खरेदी-विक्री करता येतील. तुमचा रोजचा ट्रेडिंग खर्च कमी होईल आणि बाजारातील भागीदारी वाढू शकते. या संभाव्य निर्णयामुळे छोटे गुंतवणूकदारांचा खर्च कमी होणार असून कॅश मार्केटलाही नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मनीकंट्रोलच्या खास अहवालानुसार, सेबी कॅश सेगमेंटमध्ये लागू असलेल्या मार्जिनमध्ये घट करण्याचा विचार करत आहे. सेबीच्या महत्त्वाच्या समितीने अलीकडेच क्लीयरिंग कॉर्पोरेशन्स, ब्रोकर्स आणि इतर मार्केट पार्टिसिपंट्ससोबत या प्रस्तावावर चर्चा केली आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, पण चर्चेची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
मार्जिन म्हणजे काय आणि ते का चर्चेत आहे?
सध्या शेअर बाजारातील कॅश सेगमेंटमध्ये ट्रेडिंगसाठी साधारणतः 20% मार्जिन द्यावे लागते. या मार्जिनमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात:
1) VaR (Value at Risk) हे बाजारातील चढ-उतारांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला कव्हर करते.
advertisement
2) ELM (Extreme Loss Margin) हे अतिशय असामान्य बाजारस्थितीत होणाऱ्या अतिरिक्त नुकसानीपासून सुरक्षा देण्यासाठी आकारले जाते.
मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक स्टॉक्समध्ये प्रत्यक्ष रिस्क कमी असतो, पण त्यांच्यावरही एकसारखे 20% मार्जिन लावले जाते. काही स्टॉक्समध्ये 15% किंवा 25% मार्जिन लागू होणे अपेक्षित असते, पण सर्व स्टॉक्स एकाच गटात धरले जातात. त्यामुळे समितीचा विचार आहे की मार्जिन स्ट्रक्चर अधिक व्यावहारिक आणि वास्तवाशी सुसंगत केले जावे.
advertisement
SEBI चे उद्दिष्ट काय आहे?
सेबीचा मुख्य फोकस कॅश मार्केटला मजबूत करणे आणि ट्रेडिंग वॉल्यूम वाढवणे हा आहे. गेल्या तीन वर्षांत कॅश मार्केटचा दैनंदिन वॉल्यूम दुप्पट झाला असला, तरीही तो डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या तुलनेत खूपच कमी आहे. अनेक प्रसंगी सेबीचे चेअरमन तुषार कांता पांडे यांनी भारतीय भांडवली बाजार मजबूत करण्यासाठी कॅश मार्केट वाढवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
advertisement
कॅश मार्केट वॉल्यूम कसा वाढला?
(वर्षनिहाय दैनंदिन सरासरी वॉल्यूम)
2019-20: 39,148 कोटी
2020-21: 66,007 कोटी
2021-22: 72,368 कोटी
2022-23: 57,666 कोटी
2023-24: 87,978 कोटी
advertisement
2024-25: 1,20,782 कोटी
या आकड्यांवरून कॅश मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट दिसते.
मार्जिन कमी झाल्यास काय होईल?
लहान गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंग स्वस्त होईल.
कमी भांडवलात अधिक शेअर्स खरेदी-विक्री करता येतील.
कॅश मार्केटमध्ये वॉल्यूम वाढेल.
कमी खर्चामुळे अधिक ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार बाजारात सक्रिय होतील.
रिस्क मॅनेजमेंटवर परिणाम होणार नाही.
समिती स्पष्टपणे म्हणते कीफेअर मार्जिनठेवले जाईल, म्हणजे सुरक्षा कमी होणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Market: मार्केट ट्रेडिंगमध्ये होणार मोठी उलथापालथ, कमी पैशात जास्त शेअर्स ट्रेड करता येणार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement