‘तो आला तर दरवाजा उघडू नका’, टॉक्सिक टीम लीडने केला क्रूर प्रकार, HRने हातवर केले; रजा घेतली म्हणून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न

Last Updated:

Toxic Work Culture: परवानगीशिवाय एक दिवसाची रजा घेतल्यामुळे कर्मचाऱ्याला थेट ऑफिसमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट जगतातील विषारी कामकाज संस्कृती आणि मानसिक छळावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

News18
News18
एका कर्मचाऱ्याने रजा घेतली म्हणून त्याला चक्क ऑफिसमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर (Reddit) एका युजरने शेअर केलेली ही पोस्ट सध्या 'कॉर्पोरेट' जगात चर्चेचा विषय ठरत असून, 'टॉक्सिक वर्क कल्चर'चा (Toxic Work Culture) एक भीषण चेहरा यातून समोर आला आहे.
advertisement
एका कर्मचाऱ्याने रजा घेतली म्हणून त्याला चक्क ऑफिसमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली असून, परवानगी न घेता रजा घेतल्यामुळे एका कर्मचाऱ्याला थेट कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
ही घटना रेडिटवरील एका पोस्टमधून समोर आली आहे. संबंधित पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्या कर्मचाऱ्याने एक दिवसाची रजा घेतल्यानंतर त्याच्या बॉसने थेट IT आणि Workforce Management (WFM) विभागाला सांगून त्या कर्मचाऱ्याचा ऑफिस फ्लोअर अ‍ॅक्सेस बंद करून टाकला. या रेडिट पोस्टमधील दाव्यांची आम्ही स्वतंत्रपणे पडताळणी केली नाही.
advertisement
TCSच्या कर्मचाऱ्याची Salary Slip व्हायरल,पगार इतका झाला स्लिप पाहून HR घाबरतोय
रेडिटवरील r/Indianworkplace या सबरेडिटवर एका युजरने लिहिले की, त्यांच्या टीममधील एका कर्मचाऱ्याने जवळपास आठवडाभर आधी रजेसाठी अर्ज केला होता. मात्र ती रजा मंजूर करण्यात आली नव्हती. वैयक्तिक कारणांमुळे संबंधित कर्मचारी त्या दिवशी कामावर हजर राहू शकला नाही. पोस्ट करणाऱ्या युजरच्या मते, अशा प्रकारच्या अनुपस्थिती या कॉर्पोरेट भारतात सामान्य मानल्या जातात आणि त्या ‘अनप्लॅन्ड लीव्ह’ किंवा ‘लॉस ऑफ पे (LOP)’ अंतर्गत मोजल्या जातात.
advertisement
विशेष म्हणजे ही घटना त्या युजरच्या स्वतःच्या एक महिन्याच्या वैद्यकीय रजेनंतर कामावर परतल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी घडल्याचे त्याने नमूद केले आहे.
ऑफिसमध्ये प्रवेशावर थेट बंदी
रेडिट पोस्टमध्ये म्हटले आहे की, संबंधित कर्मचारी अनुपस्थित राहिल्यानंतर टीम लीडने अक्षरशः “पॉवर ट्रिप मोड” मध्ये जात WFM आणि IT विभागाला त्याचा फ्लोअर अ‍ॅक्सेस बंद करण्याचे आदेश दिले. एवढ्यावरच न थांबता, WFM चे कर्मचारी थेट ऑफिस फ्लोअरवर फिरत होते आणि इतर कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना देत होते की, जर तो कर्मचारी ऑफिसमध्ये आला आणि काचांच्या दरवाजावर टॅप केला, तर कोणीही दरवाजा उघडू नये. त्याऐवजी तात्काळ टीम लीड किंवा SME (Subject Matter Expert) यांना कळवावे.
advertisement
युजरने असे म्हटले आहे की, या सगळ्या सूचना मुद्दाम तोंडी देण्यात आल्या, कारण त्या लेखी स्वरूपात दिल्या असत्या तर त कायदेशीर अडचणीचे ठरल असत. विशेष म्हणजे ही कारवाई एखाद्या निलंबित किंवा सेवेतून काढलेल्या कर्मचाऱ्यावर नव्हे, तर केवळ एका दिवसासाठी अनुपस्थित राहिलेल्या, पगारावर असलेल्या कर्मचाऱ्यावर करण्यात आली होती. यामुळे टीम लीड आणि व्यवस्थापन प्रत्यक्षात एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचे कामच करू न देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युजरने केला.
advertisement
युजरने पुढे लिहिले की, “तो कर्मचारी जर ऑफिसमध्ये आला असता, तर तो काम करण्यास पूर्णपणे तयार होता. पण व्यवस्थापनानेच त्याला आत येण्यापासून रोखले, त्यामुळे तो लॉग-इनसुद्धा करू शकला नाही. मग अशा कृतीतून नेमकं साध्य काय करायचं आहे? एखाद्याला काम करू देत नाही आणि नंतर त्याला मॅन्युअली अनुपस्थित दाखवतो, याला शिस्त म्हणता येत नाही. हे मुद्दाम अनुपस्थिती तयार करण्यासारखं आहे. कर्मचाऱ्याला LOP मध्ये ढकलण्याचा किंवा त्याला ‘नॉन-कॉम्प्लायंट’ ठरवण्याचा हा प्रकार आहे.”
या संपूर्ण घटनेला युजरनेconstructive termination आणि harassment यांचा संगम” असे संबोधले आणि इतर कोणाला अशा प्रकारच्या विषारी कामकाजाच्या संस्कृतीचा अनुभव आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
या पोस्टनंतर रेडिटवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. अनेक युजर्सनी विचारले की, संबंधित कर्मचाऱ्याने ही बाब वरिष्ठांकडे किंवा HR कडे मांडली का. काहींनी त्याला सल्लाही दिला.
एका युजरने लिहिले, “तो कर्मचारी घरी जाऊ शकतो आणि HR ला ईमेल करून विचारू शकतो की ऑफिस कधी त्याच्यासाठी खुले होईल. तोपर्यंत घरी बसून पगार घ्यावा.”
दुसऱ्या युजरने उपरोधिक टिप्पणी करत म्हटले, “काही काळानंतर ऑफिसच्या प्रवेशद्वारावर बाऊन्सरच उभे असतील, ज्यांचं काम अशा ‘गुन्हेगारांची’ काळजी घेणं असेल. ही परिस्थिती खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळता आली असती.”
एका अन्य युजरने सल्ला दिला, “त्याला HR ला मेल टाकायला सांगा आणि टीम लीडने निर्माण केलेल्या या सर्कसची संपूर्ण माहिती द्या. गरज भासल्यास HR हेडलाही CC मध्ये घ्या.”
मात्र काही युजर्स कंपनीच्या बाजूनेही बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की, पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण पार्श्वभूमी माहिती नसण्याची शक्यता आहे, कारण तो स्वतः रजेवर होता. एका युजरने लिहिले की, WFM कडून इतर कर्मचाऱ्यांना एखाद्याला आत येऊ न देण्याच्या सूचना देणे ही सामान्य पद्धत आहे. तसेच फक्त एका व्यक्तीच्या कथनावरून आणि अपूर्ण माहितीच्या आधारे संपूर्ण कार्यस्थळाला विषारी ठरवणे योग्य नाही. जर हा प्रकार वारंवार घडत असेल तर वेगळी गोष्ट, पण एका घटनेवरून निष्कर्ष काढता येत नाही, असेही त्याने नमूद केले.
या पोस्टमुळे आणि त्यावर झालेल्या चर्चेमुळे कामाच्या ठिकाणी असलेला दबाव, वरिष्ठ व्यवस्थापनाशी व्यवहार करताना येणारी भीती आणि रजा घेण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेली असुरक्षितता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अनेकांनी या घटनेमागे अजून काही वेगळं कारण असण्याची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी संबंधित कर्मचाऱ्याने HR विभागाकडे अधिकृत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
‘तो आला तर दरवाजा उघडू नका’, टॉक्सिक टीम लीडने केला क्रूर प्रकार, HRने हातवर केले; रजा घेतली म्हणून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement