14 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, चांदीने मोडले आजवरचे सगळे रेकॉर्ड, कधी थांबणार दरवाढ?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चांदीचे दर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 1,32,250 रुपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक बाजारात 14 वर्षांचा उच्चांक. दिवाळीपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता.
चांदीचे दर 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर रोजी मिळून 7 हजार रुपयांनी वाढले होते. त्यानंतर आज पुन्हा दरवाढ पाहायला मिळाली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या दरांना नवा विक्रम केला. चांदीचे दर 1 लाख 32 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दिवळीपर्यंत चांदीचे दर 1 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. सोन्याप्रमाणेच आता चांदीही चकाकी वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत चांदीने 14 वर्षांचा उच्चांक गाठला. चांदीचा दर प्रति औंस 43.5 डॉलरच्या पुढे गेला आहे, तर भारतीय बाजारात MCX वर चांदीने 1,32,250 रुपये प्रति किलो असा नवा विक्रम नोंदवला आहे.
या तेजीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची शक्यता
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची कपात केली होती. या निर्णयामुळे गुंतवणूकदार आता भविष्यातही आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा करत आहेत. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो, कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. त्यामुळेच सध्या सोन्या-चांदीच्या दरांना मोठी चालना मिळाली आहे.
advertisement
औद्योगिक मागणीत वाढ
चांदी केवळ दागिने आणि गुंतवणुकीसाठीच नाही, तर औद्योगिक क्षेत्रातही तिचा मोठा वापर होतो. सध्या सौर ऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकूण जागतिक मागणीपैकी ६०% मागणी औद्योगिक क्षेत्राकडून येते. यामुळे, औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
advertisement
पुरवठ्याचा तुटवडा
सध्या जागतिक बाजारपेठेत चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण खाणीतून मिळणाऱ्या चांदीच्या उत्पादनात वाढ झालेली नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांदीच्या किमती वाढत आहेत. यामुळे भविष्यातही चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे चांदी सध्या गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय बनली आहे आणि अनेक गुंतवणूकदार सोन्यापेक्षा चांदीला अधिक महत्त्व देत आहेत.
advertisement
चांदीचे दर अचानक एवढे वाढल्याने आता चांदी मागणी कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सराफ मार्केटवर होऊ शकतो. दसऱ्याला सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याआधीच दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा दिवाळी सोनं चांदी खरेदी न करताच होतोय का? सराफ मार्केटकडे लोक पाठ फिरवणार अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यांनी सोन्या चांदीत ETF, फंड्समधून गुंतवणूक केलीय त्यांना मोठा फायदा झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
14 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, चांदीने मोडले आजवरचे सगळे रेकॉर्ड, कधी थांबणार दरवाढ?