Share Marketचे समीकरण बदलणार; सेक्सेक्समधून टाटा मोटर्सची होणार एक्झिट, बाजारात मोठी उलथापालथ

Last Updated:

Tata Motors: सेक्सेक्सचा 38 वर्षांचा इतिहास बदलण्याच्या उंबरठ्यावर असून, टाटा मोटर्स या प्रतिष्ठित कंपनीला इंडेक्समधून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. डिमर्जरनंतर मार्केट कॅप घसरल्याने कंपनीचे स्थान डळमळले असून, इंडिगो आणि ग्रासिम या नव्या दावेदारांनी बाजारात खळबळ उडवली आहे.

News18
News18
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेक्सेक्सच्या सुरुवातीपासून सातत्याने त्याचा भाग असलेली टाटा मोटर्स आता या सर्वात जुन्या स्टॉक इंडेक्समधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. 1986 मध्ये सेक्सेक्सची सुरुवात झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी समाविष्ट झालेल्या या कंपनीचे मार्केट कॅप आता आवश्यक किमान मर्यादेला पोहोचत नाही. कारण ऑक्टोबर 2025 मध्ये कॉमर्शियलपॅसेंजर व्हेईकल व्यवसाय वेगळे झाल्यानंतर कंपनीची एकत्रित बाजारमूल्य दोन भागांत विभागली गेली आहे.
advertisement
डिमर्जरनंतर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे मार्केट कॅप 1.37 लाख कोटी रुपये, तर टाटा मोटर्स लिमिटेड (कॉमर्शियल व्हेईकल) चे मार्केट कॅप 1.19 लाख कोटी रुपये झाले आहे. सेक्सेक्समध्ये टिकून राहण्यासाठी सध्या जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप आवश्यक आहे, जे कंपनी आता पूर्ण करू शकत नाही.
advertisement
BSE येत्या 19 डिसेंबरला सेंसेक्सची नवी यादी जाहीर करणार असून, त्यात टाटा मोटर्सच्या जागी देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स इंटरग्लोब एविएशन (इंडिगो) समाविष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच आदित्य बिरला समूहाची ग्रासिम इंडस्ट्रीजही यात येऊ शकते. या बदलांचा त्वरित परिणाम बाजारावर दिसू शकतो. सेंसेक्समधील 30 पैकी फक्त चार कंपन्या टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, HUL आणि ITC या सुरुवातीपासून कायम आहेत. परंतु आता या यादीतून टाटा मोटर्स बाहेर जाण्याची वेळ आली आहे. याआधी जूनमध्ये नेस्ले बाहेर पडले होते.
advertisement
सेक्सेक्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कंपनीचे फुल मार्केट कॅप देशातील टॉप-75 कंपन्यांमध्ये असणे आवश्यक असते, तसेच फ्री-फ्लोट मार्केट कॅपवर आधारित किमान 0.5% वेटेज असणे गरजेचे आहे. दुसरीकडे इंडिगोचे मार्केट कॅप 2.27 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, सेक्सेक्सबाहेरील कंपन्यांमध्ये ती सर्वात मजबूत दावेदार आहे.
advertisement
टाटा मोटर्सची सदस्यता कमी झाल्यास गुंतवणूकदारांच्या विश्वासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पेरिस्कोप अॅनालिटिक्सचे विश्लेषक ब्रायन फ्रेटास यांच्या मते, सेक्सेक्समधून वगळल्यास कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी बिकवाली होऊन 2,232 कोटी रुपयांचा निधी बाजारातून बाहेर जाऊ शकतो. उलट इंडिगो सेंसेक्समध्ये आली तर तिच्या शेअर्समध्ये अंदाजे 3,157 कोटी रुपयांचा निधी येण्याची शक्यता आहे. ग्रासिम इंडस्ट्रीज समाविष्ट झाल्यास सुमारे 2,526 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रवाह होऊ शकतात.
advertisement
या घडामोडींमध्ये टाटा समूहाच्या अंतर्गत नवीन तणावही उघड होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन आणि टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन आर. वेंकटरामनन यांच्यात ट्रस्टच्या नॉमिनेटेड सदस्यांच्या मतदानाधिकारांवरून मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रशेखरन यांनी ट्रस्ट सदस्यांचे मतदानाधिकार कमी करण्याची मागणी केली असून, वेंकटरामनन यांनी त्याला ट्रस्टच्या स्वायत्ततेवरचा आघात म्हटले आहे. तसेच नोएल टाटा यांचे पुत्र नेव्हिल टाटा यांना सर रतन टाटा ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्याबाबतही मतभेद आहेत. ट्रस्टी वेणू श्रीनिवासन यांनी या निर्णयाला विरोध करून ही प्रक्रिया थांबवली आहे.
advertisement
दरम्यान टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. 17 नोव्हेंबरला शेअर 4.74% घसरला आणि दिवसभरात तो 7%ने खाली जात 363वर आला. गेल्या पाच दिवसांत शेअर 8% पेक्षा जास्त घसरला आहे. एका महिन्यात 6%, सहा महिन्यांत 15% आणि वर्षभरात 20% घसरण झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप आता 1.44 लाख कोटी रुपये आहे. ही घसरण जुलैसप्टेंबर 2025 च्या निकालांनंतर आली असून, कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 6,368 कोटींचा नेट लॉस झाला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे JLR वर झालेला मोठा सायबर हल्ला, ज्यामुळे प्रोडक्शन थांबले आणि कंपनीचे आर्थिक परिणाम बिघडले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Marketचे समीकरण बदलणार; सेक्सेक्समधून टाटा मोटर्सची होणार एक्झिट, बाजारात मोठी उलथापालथ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement