कोणत्या लाडक्या लेकीला वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागता येत नाही? तुमचं तर नाव नाही?

Last Updated:

या कायद्याचा आधार घेऊन जर तुम्ही वडिलांना किंवा भावासोबत भांडत असाल तर या कायद्यातील तरतूदी आधी माहिती असणं आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई : मुलगी म्हणजे परक्याचं धन त्यामुळे लग्न झालं की तिचा माहेरचा हक्क अधिकार संपला असं अगदी सहज म्हटलं जातं. पूर्वी मुलींना संपत्ती किंवा वापरसा हक्काने आलेल्या जमिनीतही कोणताही अधिकार नव्हता. मात्र 2005 रोजी कायद्यात एक सुधारणा करण्यात आली त्यानंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये कायदाने हिस्सा देणं बंधनकारक आहे. मुलगा मुलगी समान आहेत त्यामुळे वडिलांच्या संपत्तीवर मुलींचाही अधिकार आहे असं या कायद्यात सांगितलं होतं. मात्र या कायद्याचा आधार घेऊन जर तुम्ही वडिलांना किंवा भावासोबत भांडत असाल तर या कायद्यातील तरतूदी आधी माहिती असणं आवश्यक आहे.
या कायद्यानुसार अशाही काही अटी आणि नियम आहेत ज्यामुळे लाडकी लेक वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागू शकत नाही. कायदा तो अधिकार देत नाही. मग संपत्तीमध्ये हिस्सा केव्हा मागता येतो आणि कधी मागता येत नाही या दोन्ही गोष्टी अगदी सोप्या भाषेत आज समजून घेऊया.
भारतात वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क कायद्यानं मान्य केला आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, 2005 नुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीवर मुलांइतकाच अधिकार आहे. विवाहित किंवा अविवाहित, दोघीही वडिलांच्या प्रॉपर्टीत समान हक्क मागू शकतात. मात्र, काही विशेष परिस्थितींमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळत नाही.
advertisement
1. वडिलांनी मृत्यूपत्र तयार केलं असेल तर:
जर वडिलांनी जिवंतपणी मृत्यूपत्र तयार करून संपत्तीचा हक्क मुलगा किंवा इतर कुणाला दिला असेल, तर मुलींना त्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही. तिथे मुलींना भांडण्याचा अधिकार नाही. वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल, तर ती कशा प्रकारे वाटायची याचा निर्णय घेण्याचा हक्क त्यांना आहे.
2. वडिलांची मृत्यू 1956 पूर्वी झाली असेल:
जर वडिलांचे निधन 1956 पूर्वी, म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा लागू होण्याआधी झाले असेल, तर त्या संपत्तीवर मुलींना हक्क नसतो. अशा प्रकरणांमध्ये त्या काळातील प्रचलित कायद्यानुसार संपत्तीचे वाटप केले जाते, ज्यामध्ये मुलींना वारस म्हणून गृहित धरलं जात नाही.
advertisement
3. संपत्ती कायदेशीर वादात असताना:
जर वडिलांची संपत्ती कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात किंवा कायदेशीर वादात अडकलेली असेल, तर मुलींना त्या संपत्तीवर दावा करता येत नाही.
4. वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती नसल्यास:
जर वडिलांनी वडिलोपार्जित संपत्ती न कमावता स्वतःच ती संपत्ती निर्माण केली असेल, तर तिच्या वाटपाचा पूर्ण अधिकार वडिलांकडे असतो.
वडिलांच्या संपत्तीवर हक्क मागण्यासाठी मुलींनी योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा. तसेच वडिलोपार्जित आणि स्वतःची मिळकत यामधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
advertisement
कोणाला हक्क मागता येतो?
मुलींना त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्ता समान हक्क आहे. जर वडिलांनी स्वतःची संपत्ती कमावली असेल, खरेदी केली असेल तर त्यावर वडिलांना वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मुलींनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवणं आणि हिंदू उत्तराधिकार कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकतं.
मराठी बातम्या/मनी/
कोणत्या लाडक्या लेकीला वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागता येत नाही? तुमचं तर नाव नाही?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement