Mumbai News : आधी पाठलाग, मग शिक्षिकेसोबत..; मिरा रोडमधील घटनेने सर्वत्र खळबळ
Last Updated:
Mira Road Crime : मीरा रोडच्या काशिगाव परिसरात 31 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करत अश्लील हावभाव केल्याप्रकरणी तरुणाविरोधात काशिगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : मीरा रोड येथील काशिगाव परिसरात राहणाऱ्या एका 31 वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिका खासगी शाळेत शिक्षण देतात. आरोपी कप्तान यादव (वय 26) हा गेल्या काही दिवसांपासून शिक्षिकेचा सतत पाठलाग करत असल्याची माहिती आहे.
आधी पाठलाग, नंतर मर्यादा ओलांडली
शिक्षिका घराबाहेर पडताच किंवा शाळेत जाताना आरोपी त्यांच्याकडे अश्लील हावभाव करत असे. घराजवळ, शाळेच्या परिसरात तसेच काशिमीरा नाका परिसरातही त्याने अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीच्या या त्रासामुळे शिक्षिकेला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
अखेर शिक्षिकेने धाडस दाखवत काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी कप्तान यादव याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 11:28 AM IST











