एसी लोकल आली,थांबली… पण उतरण्याचा मार्गच नाही; दादरमध्ये ऐन गर्दीच्या वेळी असं काय घडलं,VIDEO
Last Updated:
Mumbai Ac Local : दादर स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली. लोकल थेट भायखळा स्थानकात गेली. दादरला उतरणाऱ्या प्रवाशांना पुढे जावे लागल्याने मध्य रेल्वेवर नाराजी व्यक्त झाली.
मुंबई : बदलापूर ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमध्ये बुधवारी सकाळी घडलेला प्रकार प्रवाशांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. सकाळी 10.42 वाजता बदलापूरहून सुटलेली जलद एसी लोकल नेहमीप्रमाणे दादर स्थानकात आली पण येथे थांबल्यानंतरही लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत. काही क्षणांतच डब्यातील प्रवाशांमध्ये भीती पसरली होती शिवाय घडलेल्या या प्रकाराने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
लोकलमध्येच राहावं लागलं
मिळालेल्या माहितीनुसार,एसी लोकल तब्बल 5 ते 10 मिनिटे दादर स्थानकात उभी होती. प्रवासी दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते, पण काहीही झाले नाही. मात्र काही वेळाने एसी लोकलचे दरवाजे न उघडताच एसी लोकल थेट पुढे गेली झाली. दादरला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी हा धक्काच होता. काही प्रवासी घाबरून गेले तर काहींनी संताप व्यक्त केला.
advertisement
@Central_Railway Door Has Been Not Open At Dadar CR pic.twitter.com/1yDg9ojt8T
— 🇮🇳🕉️Abhishek Attkan 🚩🇮🇳 (@AbhishekAttkan) December 17, 2025
">http://
@Central_Railway Door Has Been Not Open At Dadar CR pic.twitter.com/1yDg9ojt8T
— 🇮🇳🕉️Abhishek Attkan 🚩🇮🇳 (@AbhishekAttkan) December 17, 2025
advertisement
भायखळा स्थानकात पोहोचल्यानंतरच अखेर एसी लोकलचे दरवाजे उघडले. त्यानंतर दादरला उतरणारे प्रवासी भायखळ्यात उतरले. दादर स्थानकात उतरायचे असलेल्या प्रवाशांना तब्बल 6.4 किलोमीटर पुढे येऊन पुन्हा डाउन दिशेने प्रवास करावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढला.
घटनेचे नेमके कारण काय?
view commentsप्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भायखळा स्थानकात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मोटरमनच्या केबिनमध्ये सात प्रवासी होते. मात्र गार्ड हा ट्रेनचा प्रभारी असल्याने मोटरमनकडे दरवाजे उघडण्याची थेट यंत्रणा नव्हती. तसेच कोचमधील टॉक-बॅक मेकॅनिझम बॉक्स कार्यरत नव्हता किंवा उपलब्ध नव्हता अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने एसी लोकलमधील प्रवासी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
एसी लोकल आली,थांबली… पण उतरण्याचा मार्गच नाही; दादरमध्ये ऐन गर्दीच्या वेळी असं काय घडलं,VIDEO








