छठ पूजा- दिवाळीनिमित्त मुंबई- वाराणसी १२ विशेष गाड्या धावणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि वाराणसी दरम्यान एकूण १२ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि वाराणसी दरम्यान एकूण 12 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 या काळात धावणार असून सणासुदीच्या काळातील प्रवास सुलभ होणार आहे.
गाडी क्रमांक 04225 ही विशेष गाडी 14 ऑक्टोबर 2025 पासून 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 04:55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 02:05 वाजता वाराणसी येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 04226 ही गाडी 13 ऑक्टोबर 2025 पासून 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्येक सोमवारी मध्यरात्री 01:35 वाजता वाराणसी येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 02:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
advertisement
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापति (भोपाळ), बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी येथे थांबे असणार आहेत. गाडीची संरचना ४ वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय आणि २ जनरेटर कार्स अशी असेल ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येईल.
advertisement
गाडी क्रमांक 04225 साठी आरक्षण १२ ऑक्टोबर २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवाशांनी अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितली आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
छठ पूजा- दिवाळीनिमित्त मुंबई- वाराणसी १२ विशेष गाड्या धावणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक