ST Fare: दिवाळीआधी एसटीचं गिफ्ट, ‘आवडेल तेथे प्रवास’ झाला स्वस्त, आता किती मोजावे लागणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
ST Fare: दिवाळीआधी एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. एसटीचा पर्यटन पास स्वस्त झाला असून दिवाळीच्या सुट्टीत फायदा होणार आहे.
मुंबई: दिवाळी आणि सुट्टीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळीने मोठा निर्णय घेतला असून पर्यटकांना फायदा होणार आहे. दिवाळीत अनेकजण तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. नागरिकांची हीच आवड लक्षात घेऊन 'आवडेल तेथे प्रवास' योजनेच्या भाडेदरात किमान 225 ते कमाल 254 रुपयांपर्यंत मोठी कपात करण्यात आलीये. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार जानेवारी 2025 पासून जवळपास 15 टक्के भाडे वाढ लागू झाली होती. तर आगामी दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीसाठी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
advertisement
राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता महामंडळाने हंगामी दरवाढ रद्द केली आहे. यामुळे 'आवडेल तेथे प्रवास' योजनेअंतर्गत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.
प्रौढांसाठी 4 दिवसांचा पास
एसटीच्या आवडेल तेथे प्रवास योजनेत प्रौढ आणि मुलांसाठी चार दिवस आणि सात दिवस अशा स्वरूपात पास आहेत. महामंडळातील साधी, जलद, रातराणी, शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये या योजनेतील पास ग्राह्य आहेत. विशेष म्हणजे या पासवर प्रवाशांना अमर्यादित प्रवासाची मुभा आहे.
advertisement
कसे असेल भाडे?
साधी बससेवा (साधी, जलद, रात्रसेवा)(आंतरराज्यसह)
प्रकार जुने दर नवे दर
चार दिवस (प्रौढ) ₹1814 ₹1364
चार दिवस (मुले) ₹910 ₹685
सात दिवस (प्रौढ) ₹3171 ₹2382
सात दिवस (मुले) ₹1588 ₹1994
शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)
प्रकार जुने दर नवे दर
चार दिवस (प्रौढ) ₹2533 ₹1818
चार दिवस (मुले) ₹1261 ₹911
advertisement
सात दिवस (प्रौढ) ₹4429 ₹3175
सात दिवस (मुले) ₹2217 ₹1590
प्रकार 12 मीटर ई-बस (ई शिवाई)
चार दिवस (प्रौढ) ₹2861 ₹2072
चार दिवस (मुले) ₹1438 ₹1038
सात दिवस (प्रौढ) ₹5003 ₹3619
सात दिवस (मुले) ₹2504 ₹1812
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ST Fare: दिवाळीआधी एसटीचं गिफ्ट, ‘आवडेल तेथे प्रवास’ झाला स्वस्त, आता किती मोजावे लागणार?