BMC Election: मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजपची मोठी खेळी, शिंदेंना इतक्या जागा मिळणार?
- Published by:Sachin S
Last Updated:
भाजप शिवसेनेच्या जागा वाटपात मुंबई पालिकेत शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार?
मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भलेही दोन्ही पक्षांमध्ये पालिकेच्या 150 जागांवर एकमत झाल्याचं दावा केला जात असला तरी भाजपनं शिवसेनेला आतापर्यंत केवळ 48 जागा सोडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजप-सेनेतील जागावाटपाचा तिढा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना नेत्यांकडून जागावाटपाबद्दल दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळी आहे. भलेही भाजप-शिवसेना नेत्यांच्या बैठकीत पालिकेच्या 227 पैकी 150 जागांवर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी जागा वाटपावर एकमत होताना दिसत नाही.
भाजपनं जवळपास 102 जागा तर शिवसेनेनं 109 जागांवर दावा ठोकल्याचं बोललं जातंय. तसंच भाजपनं एकमत झालेल्या 150 जागांपैकी शिवसेनाला केवळ 48 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपच्या या दाव्याला गेल्या वेळच्या निवडणुकीतील संख्याबळाचा आधार आहे.
advertisement
2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं 82 जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेनं
84 जागा जिंकत पालिकेची सत्ता काबीज केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन शकलं झाली. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. पण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मुंबई पालिकेत गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व जागांसाठी आग्रही आहे आणि त्यामुळेचं जागा वाटपात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.
advertisement
दोन दिवसात अंतिम निर्णय होणार चर्चा करून अंतिम निर्णय घेऊन. ज्याठिकाणी खूप जास्त संख्या त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्याठिकाणी वाद होणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तर, शिंदेंच्या नेृत्वातील शिवसेनेकडून गेल्या वेळी जिंकलेल्या जागांचा दाखला देत केलेला दावा भाजपला मान्य नाही. गेल्या काही वर्षात अनेक प्रभागांतील राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच गेल्या वेळी एकसंध शिवसेनेनं जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याचं बोललं जातंय.
advertisement
भाजप शिवसेनेच्या जागा वाटपात मुंबई पालिकेत शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार? शिवसेना किती जागांवर राजी होणार यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजपची मोठी खेळी, शिंदेंना इतक्या जागा मिळणार?









