मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार? 805 कोटी खर्चून उभारणार ब्रिज; कसा असेल मार्ग?

Last Updated:

दक्षिण मुंबईतील भायखळा आणि माझगाव भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने भायखळ्याच्या वाय- ब्रिजला जेजे फ्लायओव्हरशी जोडण्यासाठी केबल- स्टेड फ्लायओव्हरच्या बांधकामासाठीच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार? 805 कोटी खर्चून उभारणार ब्रिज; कसा असेल मार्ग?
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार? 805 कोटी खर्चून उभारणार ब्रिज; कसा असेल मार्ग?
दक्षिण मुंबईतील भायखळा आणि माझगाव भागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भायखळ्याच्या वाय- ब्रिजला जेजे फ्लायओव्हरशी जोडण्यासाठी 805 कोटी रूपयांच्या केबल- स्टेड फ्लायओव्हरच्या बांधकामासाठीच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.
850 मीटर लांबीच्या या स्ट्रक्चरमुळे पूर्व उपनगरे आणि बेटांवरील शहर (Island City) यांच्यातील संपर्क सुधारून पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पात माझगावमधील ऑलिव्हंट ब्रिजला जोडणाऱ्या दोन अतिरिक्त मार्गांचा देखील समावेश आहे, ज्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला मुंबईकरांना सहज प्रवेश मिळेल.
मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन उड्डाणपूल नागपाडा येथील जेजे रोडवरील साबू सिद्दीक पॉलिटेक्निक कॉलेज आणि रिचर्डसन अँड क्रुडास (Richardson & Cruddas) या दोन्हीही ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडींमुळे प्रवाशांची लवकरच मुक्तता होईल.
advertisement
"मेन कॅरेजवे मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळील वाय- ब्रिजला थेट जेजे फ्लायओव्हर रॅम्पशी जोडेल. मुख्य रचना वाय- ब्रिजला जेजे फ्लायओव्हरशी जोडेल, तर दोन्ही बाजूंचे दोन अतिरिक्त मार्ग ऑलिव्हंट ब्रिजमार्गे माझगाव येथून जोडतील." असे बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन Y-ब्रिजचे काम बीएमसी आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) यांच्या संयुक्तरित्या केले जाणार आहेत. 1922 साली बांधलेला, सध्याचा Y-ब्रिज, जो त्याच्या विशिष्ट Y-आकाराचा लँडमार्क आहे, तो नागरी सर्वेक्षणानंतर संरचनात्मकदृष्ट्या अयोग्य आढळला. आता तो केबल- स्टेड ब्रिज म्हणून पुनर्बांधणी केला जात आहे, ज्याचा पहिला टप्पा मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
नवीन उड्डाणपुलासाठी पूर्णपणे निधी बीएमसी देईल, जी स्टेनलेस स्टीलमध्ये बांधकाम करण्याची योजना आखत आहे, जे पारंपारिक साहित्यांपेक्षा अधिक टिकाऊ आणि बांधण्यासाठी उत्तम आहे. "पुलाचे आयुष्य वाढविण्यासाठी, बांधकाम योग्यरित्या आणि कमी वेळात करण्यासाठी नवीन पूल स्टेनलेस स्टीलमध्ये बांधले जात आहेत. केबल-स्टेड डिझाइनमुळे पारंपारिक मॉडेल्सच्या तुलनेत बांधकामासाठी कालावधी कमी होतो." असे एका महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
advertisement
प्राथमिक अंदाजानुसार, संपूर्ण प्रकल्पासाठी 805.15 कोटी रूपये इतका खर्च लागण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच कंत्राटदारांकरिता कामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एकदा काम मंजूर झाल्यानंतर, हा प्रकल्प पावसाळ्याचा कालावधी वगळता १८ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार? 805 कोटी खर्चून उभारणार ब्रिज; कसा असेल मार्ग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement