Mumbai Local : मुंबईकर लोकलच्या गर्दीत घुसायची गरज नाही, रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य आणि हार्बर मार्गावर होणार फायदा!

Last Updated:

Mumbai Local Train Update : नव्या वर्षात मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे. मध्य रेल्वेवर 10 नवीन फेऱ्या होणार असून हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू होणार आहेत.

Mumbai local trains
Mumbai local trains
मुंबई : मुंबई लोकल ट्रेनही लाखो नागरिकांच्या प्रवासाचे दररोज साधन आहे आता याच प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जी की मुख्य मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढणार असून हर्बल मार्गावर एसी लोकल सुरु होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात लोकल सेवांमध्ये मोठा बदल
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावर साधारण 10 ते 12 अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवण्याचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. यासोबतच 15 डब्यांच्या अतिरिक्त लोकल गाड्याही सुरू केल्या जाणार आहेत, ज्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक जागा मिळेल.
हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार?
एवढेच नाही तर हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही आनंदाची बातमी मिळाली आहे. ज्यात रेल्वे बोर्डाने एसी लोकल चालवण्याची परवानगी दिल्यामुळे हार्बरवरील प्रवाशांना लवकरच प्रवाशांना थंडगार, आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नेरूळ-उरण मार्गावरही 10 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत.
advertisement
मुख्य मार्गावर फेऱ्या वाढविण्यासाठी काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे वळवण्यात येणार आहेत, ज्यामुळे लोकल सेवेत सुधारणा होईल आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवता येईल. याशिवाय 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी मुंबईतील तब्बल 34 स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 27 स्थानकांची लांबी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामुळे 12 डब्यांच्या सुमारे 10 लोकल गाड्या आता 15 डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.
advertisement
सध्या मध्य रेल्वेवर 1810 तर पश्चिम रेल्वेवर 1406 फेऱ्या चालवल्या जात आहेत.पण आता नव्या सुधारित वेळापत्रकासह आणि अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांना गर्दी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबईकर लोकलच्या गर्दीत घुसायची गरज नाही, रेल्वेचा मोठा निर्णय, मध्य आणि हार्बर मार्गावर होणार फायदा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement