Mumbai Local Block : प्रवाशांचे मेगा हाल! मध्य रेल्वेचा मोठा ब्लॉक जाहीर, कधी अन् कोणत्या लोकलवर होणार परिणाम?

Last Updated:

Central Railway block Update: पुढील आठवड्यापासून मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडून प्रत्येकी दोन तासांचे एकूण 19 रात्रकालीन ब्लॉक घेतले जाणार असून लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Central Railway block
Central Railway block
मुंबई : मुंबईकरांनो तयार राहा दररोज प्रवास करणार असाल तर प्रवासात होणार मोठा त्रास,कारण मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेत प्रत्येकी दोन तासांचे एकूण 19 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकदरम्यान पुलावरील गर्डर्स कापण्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून अंतिम वेळापत्रक लवकरच सांगण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी
एल्फिन्स्टन पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वे मार्गावर येत असल्याने पश्चिमेकडील लोखंडी भाग हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकचीही गरज भासणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. हा जुना पूल पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे.
रोजच्या लोकल प्रवासाला बसणार मोठा फटका?
या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे, महारेल तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक बैठका पार पडल्या. त्यानंतर सुरुवातीला दोन तासांचे 19 रात्रकालीन ब्लॉक घेऊन प्रत्यक्ष पाडकाम सुरू करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे. याशिवाय अधिक कालावधीचा स्वतंत्र मेगाब्लॉक घेण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
सध्या मिळालेल्या ब्लॉकनुसार येत्या आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी दिली आहे.
दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर रात्री मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या 19 रात्रकालीन ब्लॉकचा परिणाम लोकलसह इतर गाड्यांवर होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी ब्लॉकचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात येईल आणि अंतिम वेळापत्रक वेळेवर जाहीर केले जाईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Block : प्रवाशांचे मेगा हाल! मध्य रेल्वेचा मोठा ब्लॉक जाहीर, कधी अन् कोणत्या लोकलवर होणार परिणाम?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement