Pune Crime: पुण्यातील बहाद्दराने थेट घरातच केली गांजाची शेती; पाहून पोलीसही चक्रावले, 4 कोटींचा साठा जप्त

Last Updated:

पिंपरी-चिंचवडमधील या बहाद्दर आरोपीने आपल्या घराचा वापर केवळ गांजा साठवण्यासाठी नव्हे, तर त्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड करण्यासाठी केला होता.

आरोपीच्या घरी धाड (AI generated photo)
आरोपीच्या घरी धाड (AI generated photo)
(अभिजित पोते, प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड : पुणे शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेले आंतरराज्यीय गांजा तस्करीचे एक मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी उध्वस्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका व्यक्तीने चक्क आपल्या राहत्या घरातच व्यावसायिक स्तरावर गांजाची लागवड केल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईची सुरुवात पुणे शहरातून झाली. पुणे पोलिसांनी एका गांजा विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण रॅकेटची आणि त्याचा मास्टरमाईंड पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरात एक मोठी मोहीम हाती घेतली आणि संबंधित आरोपीच्या घरी धाड टाकली.
advertisement
या धाडीत पोलिसांना मोठे घबाड हाती लागले. पिंपरी-चिंचवडमधील या बहाद्दर आरोपीने आपल्या घराचा वापर केवळ गांजा साठवण्यासाठी नव्हे, तर त्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड करण्यासाठी केला होता. पोलिसांना घरात गांजाची झाडे, लागवडीसाठी आवश्यक साहित्य आणि मोठ्या प्रमाणात तयार केलेला गांजा साठा आढळून आला.
या कारवाईदरम्यान पुणे पोलिसांनी सुमारे चार कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गांजाचा हा प्रचंड साठा पाहून पोलीसही चक्रावले. या संपूर्ण रॅकेटचा बादशाह असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी शोधलं आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे तुटले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
आज दुपारी पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईबद्दल सविस्तर माहिती आणि जप्त केलेल्या साठ्याचा तपशील जाहीर करणार आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि हा गांजा कोठून आणला गेला आणि कोठे पुरवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यातील बहाद्दराने थेट घरातच केली गांजाची शेती; पाहून पोलीसही चक्रावले, 4 कोटींचा साठा जप्त
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement