Orphan Reservation : ‘तीच खरी देशसेवा’, फडणवीसांनी केलं अनाथ आरक्षणातून प्रथमच वकिल झालेल्या आश्विनचं अभिनंदन
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Orphan Reservation : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन आश्विन आगवणे हे देशातील पहिले अनाथ वकील झाले आहेत.
मुंबई : राज्यात आरक्षणावरुन वादविवाद सुरू असताना एक सुखद बातमी समोर आली आहे. 2018 मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने देशात पहिल्यादा अनाथ मुलांना आरक्षण दिलं होतं. अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून उपेक्षित राहावे लागत होते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा यासाठी शिक्षण व नोकरीमध्ये खुल्या प्रवर्गातून 1 टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले होते. याच आरक्षणाचा लाभ घेऊन आश्विन आगवणे हा तरुण देशातील पहिला वकील झाला आहे. यासंदर्भात त्याने एक्स या माध्यमावर पोस्ट करत फडणवीस यांचे आभार मानले. या पोस्टला प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
आश्विन आगवणे यांची पोस्ट काय आहे?
आश्विन आगवणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट लिहित तत्कालीन भाजप सरकारचे जाहीर आभार मानले आहे. "आज LL.B. अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आणि अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन, मी देशातील पहिला अनाथ वकील झालो. 2018 साली महाराष्ट्रात अनाथांना देशातील प्रथम आरक्षण मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महीला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि श्रीकांत भारतीय यांचे आभार" अशी पोस्ट आश्विन आगवणे यांनी लिहिली आहे.
advertisement
अनाथांना आरक्षण निर्णय देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून अनेकांना लाभ झाला.
अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते.
आता तर आम्ही अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
आश्विन आगवणे यांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण… https://t.co/FdM4IHyJcu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2024
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनीही दिली प्रतिक्रिया
आश्विन यांच्या पोस्टला रिपोर्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. "अनाथांना आरक्षण निर्णय देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून अनेकांना लाभ झाला. अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. आता तर आम्ही अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आश्विन आगवणे यांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि ते या वर्गवारीचा लाभ घेत देशातील पहिले वकील बनू शकले. प्राध्यापक तर होतेच, आता अॅडव्होकेट सुद्धा झाले. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा. आश्विनला मी एकच सांगीन, ज्यांना कुठूनच मदत मिळत नाही, कायम त्यांच्या मदतीला धावून जा. तीच खरी ईश्वरसेवा आहे. तीच खरी मानवसेवा आहे आणि तीच खरी देशसेवा आहे", अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2024 10:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Orphan Reservation : ‘तीच खरी देशसेवा’, फडणवीसांनी केलं अनाथ आरक्षणातून प्रथमच वकिल झालेल्या आश्विनचं अभिनंदन