Mumbai: मध्यरात्री फ्रीज ठरला काळ, गोरेगावात एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Last Updated:

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर २ परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं पहाटे गाढ झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ai generated Photo
Ai generated Photo
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर २ परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास एका घरामध्ये फ्रीजचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर २ मधील एका घरात पहाटे ३ च्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत होते. याच वेळी घरातील फ्रीजचा अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीने विळखा घातला. झोपेत असल्याने घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अर्ध्या तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत आगीत अडकलेल्या तिघांचा मृत्यू झाला होता.

एकाच कुटुंबावर काळाचा घाला

या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले तिन्ही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून, झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जवानांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. फ्रीजचा स्फोट नेमका कशामुळे झाला? शॉर्ट सर्किट झाले होते का? या संदर्भात गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी सखोल तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मध्यरात्री फ्रीज ठरला काळ, गोरेगावात एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement