अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन समाजाची संख्या अधिक,पर्युषणात पर्वात प्राण्यांची कत्तल नकोच; हायकोर्टात वकिलांचा दावा
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRASHANT BAG
Last Updated:
मुघल सम्राट अकबराला देखील कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवणं सोप्प मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण असल्याचे वकिलांनी युक्तिवादा दरम्यान म्हटले आहे.
मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील काही महानगरपालिकांनी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहे. जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण काळात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयु्क्तांनी घेतला आहे. आज या प्रकरणी न्यायालयता सुनावणी झाली. दरम्यान
कोर्टात झालेल्या सुनावणीत जैन समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी मुंबई महानगपालिका आणि महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे.
जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वास मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. या कालावधीत
मुंबईत कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी, न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये, पुढील दोन आठवड्यात महापालिकेलाआपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान आज झालेल्या युक्तिवादात जैन समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी टोला लगावला आहे. मुघल सम्राट अकबराला देखील कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवणं सोप्प मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण असल्याचे वकिलांनी युक्तिवादात म्हटले आहे.
advertisement
नेमकं काय झालं सुनावणीत?
मुघल सम्राट अकबराला देखील कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवण सोप्प मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणे कठीण असे म्हणत जैन समाजाच्या वकिलांचा मुंबई महापालिकेला टोला लगावला आहे. तसेच त्याकाळी मुघल सम्राट अकबराने कत्तलखाने बंद केला होता. मुंबईत 24 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला कत्तलखाने बंद आहेत. अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन समाजाची समाज अधिक असल्याचं मुंबई महापालिकेने विचारात न घेतल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे.
advertisement
मुंबईत जैन समाजाची समाज अधिक
अहमदाबाद येथे संख्या कमी असून देखील संपूर्ण पर्यूषण पर्वात कत्तलखाने बंद आहेत. जैन समाजाची लोकसंख्या अत्यल्प असल्याच्या पालिकेच्या भूमिकेवर जैन समाजाने आक्षेप घेतला. सध्या श्रावण महिना सुरू असून अर्ध्याहून अधिक मांसाहार करणारे मुंबईकर मांसाहार करत नसल्याचा दावा याचिकेत केला आहे.
मुंबई महानगपालिकेचा याचिकाकर्त्यांना सवाल
advertisement
संपूर्ण पर्यूषण पर्व काळात कत्तलखाने बंद करण्याचा समाजाला वैधानिक अधिकार आहे का? संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात अथवा कायद्यात बसते ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 5:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन समाजाची संख्या अधिक,पर्युषणात पर्वात प्राण्यांची कत्तल नकोच; हायकोर्टात वकिलांचा दावा