Mumbai : बापरे बाप! खरंच मुंबईच्या फिनिक्स मॉलमध्ये घुसला बिबट्या? VIRAL VIDEO फेक की रिअल? Fact Check
Last Updated:
Viral Leopard Video : मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये बिबटा फिरत असल्याचा व्हायरल व्हिडीओ खोटा आहे. हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार केला गेलेला असून मॉलमध्ये प्रत्यक्ष बिबटा शिरलेला नाही. नागरिकांनी खोट्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नये.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात करत असतो. अनेकांनी या तंत्रज्ञाना वापर अतिशय सुंदररित्या केला परंतू दुसऱ्या बाजूला फेक फोटो आणि व्हिडिओंचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकांमध्ये वास्तविक आणि बनावट यातील फरक ओळखणे आता खूप कठीण झाले आहे. सोशल मीडियावर अशा AI-जनरेटेड व्हिडिओंमुळे गोंधळ आणि भीती निर्माण होत आहे. सध्या याचाच मोठा प्रत्यय मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये न घडलेल्या घटनेबद्दल खर सांगण्यात केलेला आहे.
मुंबईतील मॉलमध्ये नेमके खरचं हे घडले का?
मुंबईमधील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये एका बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून सुरुवातीला लोक खूप घाबरले. काहींनी भीती व्यक्त केली तर काहींनी हसत मजेशीर घेतले. पण तज्ज्ञांनी लगेच स्पष्ट केले की हा व्हिडिओ खरा नाही, तो फक्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला आहे. याला डीपफेक व्हिडिओ असेही म्हणतात. म्हणजेच प्रत्यक्षात बिबट्या मॉलमध्ये नाही.
advertisement
व्हिडिओ इतका खऱ्या सारखा वाटत होता की पाहणाऱ्यांना तो खरा असल्याचा भास झाला. या व्हिडिओमध्ये बिबट्याची हालचाल, सावली, चालण्याचा आवाज अगदी वास्तविक वाटत होता. व्हिडिओमध्ये बिबट्या मॉलच्या गल्लीमधून आणि भिंतीजवळून फिरताना दिसतो. लोक त्याला पाहून आश्चर्यचकित झाले आणि काही वेळाने घाबरले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी लगेच आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी हसत म्हटले, “असं वाटतंय की बिबट्या दिवाळी खरेदीसाठी मॉलमध्ये आला आहे!” तर काहींना सुरक्षा कशी असेल याची चिंता वाटली.https://www.instagram.com/reel/DP1K2EQjJqm/?utm_source=ig_embed&ig_rid=776d0ecc-09d0-4903-b221-348ed110d798
advertisement
तरीही काही तासांतच लोकांना कळाले की हा व्हिडिओ खोटा आहे. फक्त संगणकाने तयार केलेला आहे. तज्ज्ञांच्या मते, असे व्हिडिओ लोकांना घाबरवण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी बनवले जातात. फिनिक्स मॉलच्या अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की मॉलमध्ये कुठलाही बिबट्या दिसला नाही आणि हा व्हिडिओ खोटा आहे.
मुंबईतील हा प्रकार नाशिकसारख्या इतर शहरांमध्येही घडला होता. तिथे काही दिवसांपूर्वी बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. फॅक्ट चेक केल्यावर समोर आले की ते सगळे खोटे होते. काही व्हिडिओ पूर्णपणे बनावट होते तर काही AI तंत्रज्ञानाने तयार केलेले होते. लोकांनी अशा व्हिडिओंवर लगेच विश्वास ठेवू नये. हे फक्त मनोरंजनासाठी तयार केलेले असतात त्यामुळे घाबरायची गरज नाही
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : बापरे बाप! खरंच मुंबईच्या फिनिक्स मॉलमध्ये घुसला बिबट्या? VIRAL VIDEO फेक की रिअल? Fact Check