IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं! 137 चा बॉलपण खेळू शकला नाही रोहित, विराटने पुन्हा 2023 ची चूक केली!

Last Updated:

Rohit and virat same mistake Video : विराट आणि रोहितला चांगली सुरूवात करून देता आली नाही. दोन्ही खेळाडूंनी तीच चूक केली जी, वनडे वर्ल्ड कपमध्ये केली होती. नेमकं काय केलं? पाहा

Rohit and virat same mistake Video
Rohit and virat same mistake Video
India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थच्या मैदानावर पहिला वनडे सामने खेळवला जात आहे. रोहित शर्मासाठी हा सामना 500 वा सामना होता. या सामन्यात रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा फक्त 8 धावा करून आऊट झाला. तर विराट कोहलीने देखील फॅन्सला निराश केलं. तब्बल सात महिन्यानंतर खेळणाऱ्या विराट आणि रोहितला चांगली सुरूवात करून देता आली नाही. दोन्ही खेळाडूंनी तीच चूक केली जी, वनडे वर्ल्ड कपमध्ये केली होती. नेमकं काय केलं? पाहा

पहिल्या ओव्हरपासून त्रास

रोहित शर्मा याला मिचेल स्टार्क याने पहिल्या ओव्हरपासून त्रास दिला. तर दुसरीकडे हेझलवूडने देखील घातक बॉलिंग केली. मात्र, चौथ्या ओव्हरमध्ये हेझलवूडने रोहित शर्माला पाचव्या स्टंपवर बॉल फेकला अन् रोहितने डिफेन्ड करता सेकंड स्लीपमध्ये कॅच सोपवला. त्यामुळे फॅन्सचा हिरमोड झाल्याचं दिसलं. तसेच रोहित शर्माचा कॉन्फिडन्स देखील कमी झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
advertisement

चौथ्या स्टंपवरील बॉल खेळला अन्

विराट कोहली फ्रेश दिसत होता. विराटने पहिल्या बॉलपासून सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराटने आक्रमक खेळ न दाखवता आरामात खेळण्याचा प्रयत्न केला पण सातव्या ओव्हरमध्ये विराटने तीच चूक केली, जी तो आधीही करत होता. विराट कोहलीने चौथ्या स्टंपवरील बॉल खेळला अन् विराटची विकेट गेली. विराटला भोपळाही फोडता आला नाही, तो शुन्यावर बाद झाला.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
advertisement
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं! 137 चा बॉलपण खेळू शकला नाही रोहित, विराटने पुन्हा 2023 ची चूक केली!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement