Mumbai Exit Poll : उद्धव ठाकरेंचा गड ढासळणार? एक्झिट पोलच्या मुंबई-ठाण्याच्या आकड्यांनी खळबळ
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला येणार असले तरी आता एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या निकालांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला येणार असले तरी आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत उद्धव ठाकरेंचा गड असलेल्या मुंबई आणि ठाण्यात एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. मुंबईतल्या 6 तसंच ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर या पट्ट्यातला एकूण 10 जागांपैकी 8 ते 10 जागांवर महायुतीचा तर 0 ते 2 जागांवर महाविकासआघाडीचा विजय होऊ शकतो. उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई आणि आसपासच्या भागात जर त्यांना 0 ते 2 जागा मिळत असतील तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल.
मुंबईमधल्या लढती
दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना उ.बा.ठा.)
उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा (भाजप) विरुद्ध संजय दिना पाटील (शिवसेना उ.बा.ठा)
उत्तर मध्य मुंबई- ऍड.उज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस
उत्तर-पश्चिम (वायव्य) मुंबई - रवींद्र वायकर (शिवसेना) अमोल किर्तीकर (शिवसेना उ.बा.ठा)
उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप) विरुद्ध भुषण पाटील, काँग्रेस
advertisement
दक्षिण मुंबई- यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सावंत ( शिवसेना उ.बा.ठा.)
ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (शिवसेना उ.बा.ठा)
कल्याण- श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उ.बा.ठा)
भिवंडी- कपिल पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
पालघर- हेमंत सावरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना उबाठा)
advertisement
महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कल
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
advertisement
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2024 6:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Exit Poll : उद्धव ठाकरेंचा गड ढासळणार? एक्झिट पोलच्या मुंबई-ठाण्याच्या आकड्यांनी खळबळ