Maharashtra Elections : सेना भवनाच्या दारात हायव्होलटेज लढत, 'यासाठी' 'राज'पुत्राविरोधात ठाकरे उमेदवार देणार!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 Mahim : शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना दादर-माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानेही उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.
अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता दादर-माहीममधील लढत हायव्होलेटज लढत झाली आहे. अमित ठाकरे यांच्यासोबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आमदार सदा सरवणकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात उमेदवार दिला जाणार नसल्याचे म्हटले जात होते. शिवसेना शिंदे गट अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल अशी चर्चा होती. मात्र, शिंदे गटाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली. आता शिवसेना ठाकरे गटही आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. मातोश्रीवर उमेदवारांच्या नावाची चाचपणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाकडून कोण उमेदवार?
शिवसेना ठाकरे गटाकडून विभागप्रमुख महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी-दादरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली होताी. शिंदे गटासोबत काही वेळेस राडाही झाला आहे. या परिसरात पक्षाचे संघटन टिकवून ठेवण्यास महेश सावंत यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याचे म्हटले जाते. तर, दुसरीकडे प्रकाश पाटणकर यांचा माहीम भागात प्रभाव आहे. या विधानसभा क्षेत्रातील बहुतेक शाखा प्रमुखांनी महेश सावंत यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली असल्याचे सांगण्यात येते. सदा सरवणकरविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिल्यास लढत चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
ठाकरे उमेदवार का देणार?
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यानंतर आता अमितच्या विरोधात ठाकरे बिनशर्त पाठिंबा देतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ठाकरे गट आपला उमेदवार देणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी काही कारणदेखील आहेत.
advertisement
शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर होणारी ही विधानसभेची लढत उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. अशातच दादर-माहीममधील जागा सोडल्यास या भागातील संघटनेवरही परिणाम होण्याची भीती आहे. या भागात मनसे सोबत भाजपही आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी आणि शिवसैनिक कायम ठेवण्यासाठी, पक्ष वाढीसाठी शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ लढण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
मनसेने एकदा दादर-माहीममधून विजय मिळवला होता. 2009 मनसेचे नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे आदेश बांदेकर हे तिसऱ्या स्थानी होते.
इतर महत्त्वाची बातमी :
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 23, 2024 8:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections : सेना भवनाच्या दारात हायव्होलटेज लढत, 'यासाठी' 'राज'पुत्राविरोधात ठाकरे उमेदवार देणार!









