Maharashtra Elections 2024 BJP Vinod Shelar : पहिल्या यादीनंतर भाजपात वादाचे फटाके, आशिष शेलारांच्या भावाच्या उमेदवारीला विरोध, PM मोदींना पत्र...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Local Leader on Vinod Shelar: मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलर यांचा भाऊ विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत काही विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. तर, दुसरीकडे काही आमदारांची नावे जाहीर केली नाहीत. मात्र, काही ठिकाणी भाजपने जाहीर केलेल्या नावांवरून वाद सुरू झाला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले.
भाजपने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये मुंबईतील काही जागांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या यादीत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद शेलार हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.
advertisement
विनोद शेलारांच्या उमेदवारीला विरोध का?
भाजपच्या चार वॉर्ड अध्यक्ष काही पदाधिकाऱ्यांनी विनोद शेलार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. भाजपने स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिला असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी भाजपच्या मतदारसंघाबाहेरील उमेदवाराचा मुद्दा उपस्थित करून मते मिळवली असल्याचा मुद्दा या नाराज गटाने मांडला.
advertisement
पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?
स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित स्थानिक उमेदवाराची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले की, गेल्या 5 टर्मपासून पक्षाने मालाडच्या बाहेरील लोकांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे. त्यामुळे जनतेतच नाही तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही असंतोष आहे. परिणामी आम्हाला प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक वेळी अस्लम शेख आपल्या निवडणूक प्रचारात भाजपचा उमेदवार बाहेरचा असल्याचा मुद्दा बनवून 15 ते 20 टक्के मते मिळवण्यात यशस्वी होतात. विनोद शेलार यांचे नाव पुढे आल्याने बाहेरच्या व्यक्तीला तिकीट देण्याचा मुद्दा चर्चेत आला असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावेळी पक्षाने स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिल्यास कार्यकर्ते व मतदारांमध्ये सकारात्मक उत्साह व ऊर्जा निर्माण होऊन मालाड हे काँग्रेस मुक्त होईल असे या पत्रात म्हटले आहे.
advertisement

BJP Local leader oppose vinod Shelar

BJP Local leader oppose vinod Shelar
भाजपने पहिल्या यादीत जाहीर केलेले मुंबईतील उमेदवार
advertisement
> दहिसर - मनिषा चौधरी
> मुलुंड - महिर कोटेचा
> कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
> चारकोप - योगेश सागर
> मालाड पश्चिम - विनोद शेलार
> गोरेगाव - विद्या जयप्रकाश ठाकूर
> अंधेरी पश्चिम - अमित साटम
> विले पार्ले - पराग अलवणी
> घाटकोपर पश्चिम - राम कदम
advertisement
> वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
> सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन
> वडाळा - कालिदास कोळंबकर
> मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
> कुलाबा - राहुल नार्वेकर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 21, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 BJP Vinod Shelar : पहिल्या यादीनंतर भाजपात वादाचे फटाके, आशिष शेलारांच्या भावाच्या उमेदवारीला विरोध, PM मोदींना पत्र...









