Maharashtra Elections 2024 : मुंबईचा गड जिंकण्यासाठी भाजपसाठी येणार उत्तर प्रदेशातून कुमक! आमदार, नेते ठाण मांडणार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections 2024 BJP : भाजप मुंबईतील प्रचारात उत्तर प्रदेशातील नेते, आमदारांना उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री, आमदार हे गुजराती बहुल भागात प्रचार करणार आहेत.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष विभागनिहाय रणनीति आखत आहे. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतील परप्रांतीय टक्का लक्षात घेता भाजपने तशी रणनीति आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप मुंबईतील प्रचारात उत्तर प्रदेशातील नेते, आमदारांना उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री, आमदार हे गुजराती बहुल भागात प्रचार करणार आहेत.
मुंबईसह मुंबई महानगर भागात मराठी भाषिकांसह हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय झाली आहे. अनेक विधानसभा मतदारसंघातील जय-पराजयाचं पारडं फिरवण्याइतपत हिंदी भाषिक मतदारांची संख्या झाली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघातील काही ठिकाणी विजयी आमदार कोण असेल हे ठरवण्याइतपत मतदान गैरमराठी भाषिकांकडे असल्याचे सांगण्यात येते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 जागांसाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील काही नेते आणि आमदारांना मुंबईत तळ ठोकण्याचे आदेश पक्ष नेतृत्त्वाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या भागात बैठका आणि सभा घेण्याचे निर्देश या उत्तर भारतातील नेत्यांना देण्यात आले आहेत. या नेत्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबईतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक नेता, आमदाराकडे एका विधानसभेच्या जागेची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
गोव्याच्या मंत्र्यांकडे कोकणची जबाबदारी...
दरम्यान, भाजपने गोव्याचे मंत्री आणि आमदार हे महाराष्ट्रातील कोकण भागातील प्रचारात सक्रिय राहणार आहेत. कोकणलगतच्या भागात हे मंत्री आमदार महायुतीचा प्रचार करणार आहेत. तर, गुजरातचे मुख्यमंत्री, आमदार आणि भाजपचे नेते हे गुजराती भाषिकांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागात प्रचार करणार आहेत.
इतर महत्त्वाची बातमी :
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 21, 2024 1:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 : मुंबईचा गड जिंकण्यासाठी भाजपसाठी येणार उत्तर प्रदेशातून कुमक! आमदार, नेते ठाण मांडणार









