MHADA Lottery : मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीची सोडत जाहीर, इथं करा चेक

Last Updated:

मुंबईतील २०३० घरांसाठीची ही सोडत जाहर झाली असून म्हाडाने लकी ड्रॉचे विजेते घोषित केले आहेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाच्या लॉटरीची सोडत आज घोषित करण्यात आली. सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून अल्प दरात घरांसाठी लॉटरी काढण्यात येते. मुंबईतील २०३० घरांसाठीची ही सोडत जाहर झाली आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (housing.mhada.gov.in) अपडेट चेक करता येतील. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील घरांसाठीचे लकी ड्रॉ म्हाडाने घोषित केले.
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरसह इतर माहिती द्यावी लागेल. तुम्हाला एपवरून म्हाडाच्या लकी ड्रॉचे अपडेट चेक करता येतील. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानतंर लॉटरीचे डिटेल्स तुम्हाला दिसतील.
म्हाडाने मुंबईतील लॉटरीअंतर्गत २०३० घरांची जाहरीत काढली होती. यासाठी १ लाख ३४ हजार ३५० अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख १३ हजार ८११ जणांनी डिपॉझिट रक्कम भरली होती. सुरुवातीला लॉटरीची सोड़त १३ सप्टेंबरला घोषित होणार होती. पण म्हाडाने किंमती कमी केल्यानंतर तारीख पुढे ढकलली होती.
advertisement
घरांच्या किंमती केल्या होत्या कमी
म्हाडा मुंबई मंडळातर्फे (MHADA lottery 2024) 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती, पण उत्पन्न गट आणि घरांच्या किमती यात प्रचंड तफावत आहे, त्यामुळे म्हाडाच्या घरांना सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळे म्हाडाने किंमती कमी करण्याचे निर्णय घेतले, शिवाय अर्जाचा कालावधीही वाढवला होता.
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery : मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीची सोडत जाहीर, इथं करा चेक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement