MHADA Lottery: म्हाडाची बंपर लॉटरी! ठाण्यातील हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार, जाहिरात कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
MHADA Lottery: मुंबईजवळ ठाणे परिसरात हक्काचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न साकार होणार आहे. कोकण मंडळ लवकरच 2000 घरांची लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाकडून अल्पदरात घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात येते. आता कोकण मंडळाकडून लवकरच नव्याने लॉटरी काढली जाणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजने अंतर्गत 2 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू आहे. ही घरे मुंबई जवळच्या ठाण्यासह कल्याण आणि अन्य ठिकाणी असणार आहेत.
2000 घरांची सोडत
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अखत्यारितील विक्रीवाचून रिक्त घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे. 2000 घरांच्या सोडतीसाठी तयारी सुरू असून ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे ही घरे मुंबई जवळ ठाणे, कल्याण, शीळ, विरार परिसरात असून सर्वसामान्यांचं हक्काचं घर खरेदीचं स्वप्न साकार होणार आहे.
advertisement
बुक माय होम योजना
दरम्यान, कोकण मंडळातील विरार- बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता या घरांची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेअंतर्गत आणि ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे. 'बुक माय होम' योजनेस 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून हक्काचं घर घेण्यासाठी ही संकल्पना फायद्याची ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: म्हाडाची बंपर लॉटरी! ठाण्यातील हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार, जाहिरात कधी?