रस्त्यात स्कुटी अडवून परप्रांतीय फेरिवाल्यांकडून महिलेला मारहाण, मुंबईतील संतापजनक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईतील पवई परिसराजवळ ही घटना घडली आहे. २ उत्तर भारतीय फेरिवाल्यांनी हे कृत्य केलं आहे.
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पवई परिसरात रोहित आर्याचं अपहरणनाट्य घडलं होतं. त्याच परिसरात एका फेरिवाल्याने महिलेला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी २ जणांना या प्रकरणात अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पवई परिसराजवळ ही घटना घडली आहे. २ उत्तर भारतीय फेरिवाल्यांनी हे कृत्य केलं आहे. अटक केलेल्या अरविंद सिंग नामक फेरीवाला हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
पीडित महिला ही सनसिटी काॅम्पलेक्स मधील रहिवासी आहे. या महिलेनं अनधिकृत फेरिवाल्यांबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून अरविंद सिंग आणि आणखी एका फेरिवाल्याने महिलेवर हल्ला केला. पीडित महिला स्कुटीवरून जात होती, रस्त्यात स्कुटी अडवून मारहाण केली. या नराधमांनी पीडित महिलेचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेऊन महिलेची सुटका केली. या प्रकरणी पवई पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अरविंद सिंग आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
view commentsया फेरीवाल्यांनी सोसायटीच्या बाहेर स्टॉल लावले होते. हे स्टॉल अनधिकृत होते. याबद्दल मुंबई पालिकेमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पालिकेनं या तक्रारीची दखल घेऊन अनधिकृत स्टॉल हटवले होते. पण पुन्हा ही लोक इथं स्टॉल लावत होते. शुक्रवारी संध्याकाळी पीडित महिला स्कुटीवरून येत होती. त्यावेळी अरविंद नावाचा हा फेरिवाला आणि त्याचे ४ साथीदार तिथे आले आणि भर रस्त्यावर अडवलं. त्यानंतर या चारही जणांनी रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारहाण केली, अशी माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
रस्त्यात स्कुटी अडवून परप्रांतीय फेरिवाल्यांकडून महिलेला मारहाण, मुंबईतील संतापजनक घटना


