Mumbai : पैसे दिल्यावरच.., मुंबईत या रहिवाश्यांसाठी म्हाडाचा धक्कादायक निर्णय! कारण काय?

Last Updated:

Mumbai News : एल्फिन्स्टन डबलडेकर पुलाच्या कामामुळे अनेक घरे बाधित झाली आहेत. पुनर्वसनासाठी म्हाडाची घरे देण्याचा निर्णय झाला असला तरी एमएमआरडीए आणि म्हाडामधील आर्थिक वादामुळे प्रक्रिया अडचणीत आली आहे.

News18
News18
मुंबई : एल्फिन्स्टन परिसरात डबलडेकर पुलाच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र या पुलाच्या कामाला अनेक महिने स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध होता. आपल्या घरांवर आणि इमारतींवर परिणाम होणार असल्याने रहिवाशांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हे काम काही काळासाठी थांबवण्यात आले होते.पण प्रशासनाने जुना पूल पाडून नव्याने काम सुरू केले आहे.
या डबलडेकर पुलामुळे दोन इमारतींमधील एकूण 83 घरे बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास इमारतीतील 60 तर हाजी नुरानी इमारतीतील 23 रहिवाशांचा यात समावेश आहे. बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर असून त्यांना म्हाडाच्या मालकीची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या पुनर्वसनावरून आता एमएमआरडीए आणि म्हाडामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
advertisement
म्हाडाने स्पष्ट भूमिका घेतली असून आधी घरांची किंमत आणि दुरुस्तीसाठी झालेला खर्च दिल्यानंतरच घरे ताब्यात देण्यात येतील असे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेडी रेकनरनुसार 110 टक्के दराने घरांची किंमत निश्चित करण्यात आली असून ही एकूण रक्कम सुमारे 97 कोटी रुपये आहे. याशिवाय घरांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, वडाळा आणि अँटॉप हिल परिसरातील एकूण 119 घरे एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांची निवड करण्यात आली आहे. बाधित रहिवाशांची मागणी आहे की त्यांना याच परिसरात घरे मिळावीत. त्यामुळे पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : पैसे दिल्यावरच.., मुंबईत या रहिवाश्यांसाठी म्हाडाचा धक्कादायक निर्णय! कारण काय?
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray : मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, बैठकांचा धडाका,  ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट
मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब
  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

View All
advertisement