Raj Thackeray Interview : निवडून येणाऱ्यांची मोळी बांधायची असेल तर..., राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Last Updated:

Raj Thackeray Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातल्या गेल्या पाच वर्षांतील राजकीय उलथापालथ आणि जनतेच्या समस्येबाबतच्या प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिली.

News18
News18
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी स्वबळाचा नारा देत जवळपास १४० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातल्या गेल्या पाच वर्षांतील राजकीय उलथापालथ आणि जनतेच्या समस्येबाबतच्या प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही टीका केली. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे राज्यातील जनतेला माझ्या हाती सत्ता द्या असं म्हणतायत. याबद्दल विचारले असता राज ठाकरेंनी जनसंघ ते आजच्या भाजपचं उदाहरण दिलं. तसंच शरद पवार यांनाही टोला लगावला.
मनसे १४० जागा लढवतेय आणि सत्ता द्या असं आवाहन तुम्ही करत आहात असं राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी म्हटलं की,  १९५२ ला जनसंघाची स्थापना झाली. त्याचंच पुढे भाजप झालं, भाजप आता सत्तेत आली. ते सुरुवातीपासूनच सत्ता द्या सत्ता द्या म्हणत होते ना. प्रत्येक पक्ष तीच गोष्ट सांगतो. अपेक्षा असते की लोक ऐकतील आणि स्वप्न साकार होईल. प्रत्येकाचा मोठा काळ गेलेला असतो मोठा, जो स्वतच्या विचारावर ठाम असाल तर वेळ लागतो.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर पक्षाचे झालेले दोन गट यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष खोचक टीकाही केली. ते म्हणाले की, निवडून येणाऱ्या लोकांची मोळी बांधायची असेल शरद पवारांसारखी तर त्याला वेळ लागत नाही. पण एकदा का त्याची दोरी सुटली की लाकडं कुठं घरंगळत जातात हे त्याचं त्यालाच कळत नाही. त्यामुळे मी माझ्या विचारावर ठाम आहे. एक ना एक दिवस ते होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Raj Thackeray Interview : निवडून येणाऱ्यांची मोळी बांधायची असेल तर..., राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement