मुंबई-पुणे प्रवास आणखी सुस्साट, ट्रॅफिकचंही टेन्शन नाही, MSRDC ने आणलाय मास्टरप्लॅन

Last Updated:

Mumbai Pune Superhighway: मुंबई ते पुणे प्रवास आणखी सुस्साट होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक मास्टरप्लॅन आणला आहे.

मुंबई-पुणे प्रवास आणखी सुस्साट, ट्रॅफिकचंही टेन्शननं नाही, MSRDC ने आणलाय मास्टरप्लॅन
मुंबई-पुणे प्रवास आणखी सुस्साट, ट्रॅफिकचंही टेन्शननं नाही, MSRDC ने आणलाय मास्टरप्लॅन
पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या कॉरिडॉरपैकी एक मानला जातो. या मार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएअसआरडीसी) मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचे 10 लेन सुपरहायवेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
"एक्सप्रेसवेला आठ-लेन बनवण्याच्या आधीच्या प्रस्तावाला अपग्रेड केले आहे. या अपग्रेडसाठी सुमारे 1,420 कोटी रुपये खर्च येईल. त्यासाठीचा डीपीआर अंतिम केला जात असून तो मंजुरीसाठी सरकारकडे सादर केला जाईल," असे गायकवाड यांनी सांगितले. मुंबई-पुणे महामार्गावर दरवर्षी वाहतूक कोंडीत अंदाजे 5-6 टक्क्यांची वाढ होत असल्याने त्यावर दीर्घकालीन उपाय म्हणून प्रस्तावित विस्तार महत्त्वाचा मानला जातोय.
advertisement
14260 कोटींचा खर्च
मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगराला महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुण्याशी जोडणारा हा 94.6 किमीचा महामार्ग आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचे 2002 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. सध्या आठवड्याच्या दिवसांत दररोज अंदाजे 65 हजार वाहने या मार्गावरून जातात. तर आठवड्याच्या शेवटी ही संख्या 1 लाखापेक्षा जास्त होते. वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर नवीनतम प्रकल्पात सध्याच्या पायाभूत सुविधांचे रुंदीकरण समाविष्ट आहे. बांधकाम खर्च सुमारे 8,440 कोटी रुपये अपेक्षित असून प्रकल्पाचा एकूण सरासरी खर्च 14,260 कोटी रुपये असेल.
advertisement
टोलमधून उभारणार निधी
नवा सुपर हायवे हा बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर किंवा अॅन्युइटी हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, सकारकडे निधी मागण्याऐवजी, आम्ही टोल वसुलीवर अवलंबून राहू, असे गायकवाड म्हणाले. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसाठी सध्याची टोल वसुली 2045 पर्यंत वैध आहे. एक्सप्रेसवे रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यास एमएसआरडीसी मुदतवाढ मागेल जेणेकरून प्रकल्प स्वयंपूर्ण होईल.
advertisement
वेळेची बचत होणार
सध्या, मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे दोन तास लागतात. आठवड्याच्या शेवटी गर्दीचे तास आणि सुट्टीतील वाहतूक यामुळे या प्रवासाला 1 तास जादा वेळ लागतो. प्रस्तावित विस्तारामुळे हा वाढलेला प्रवास वेळ कमी होऊ शकतो. तसेच गर्दीच्या काळातही सहज प्रवास करता येईल.
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-पुणे प्रवास आणखी सुस्साट, ट्रॅफिकचंही टेन्शन नाही, MSRDC ने आणलाय मास्टरप्लॅन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement