Ashadhi Wari 2025: ‘आषाढी वारी’साठी लालपरीच येणार घरी, ST चा मोठा निर्णय, पुण्यातून 700 बस!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ashadhi Wari 2025: यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी असून पंढरीत मोठी यात्रा भरणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे : पांडुरंगाच्या पंढरीत 'आषाढी वारी'ला मोठा सोहळा असतो. त्यामुळे राज्यासह देशभरातून वारकरी आणि भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. आता याच आषाढी वारीसाठी सर्वसामान्यांची लालपरी देखील सज्ज झाली आहे. पुण्यातून पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तयारी केली असून पुण्यातून 700 बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी असून पंढरीत मोठी यात्रा भरणार आहे. आषाढी वारीला पंढरीला जाण्यासाठी अनेक भाविक पुण्यात येतात. पुण्यातून वारीला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. गेल्या काही काळापासून आषाढी वारीला जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे पुणे विभागातील 14 आगारांतून पंढरपूरला एसटी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
तर थेट गावात बस
परिवहन महामंडळाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांना ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार एकाच गावातील 40 जणांच्या समूहाने ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातूनच बस सोडण्यात येणार आहे. या लोकांसाठी लालपरीच गावात जाणार आहे. शिवाय दर्शन झाल्यानंतर त्यांना पुन्हा गावात सोडले जाईल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सोय होईल. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
advertisement
वारीसाठी एसटीचे नियोजन
पुणे विभागातील बस - 350
बाहेरील विभागातून मागविलेल्या बस - 350
पंढरपूला सोडण्यात येणाऱ्या एकूण बस - 700
मागील वर्षी सोडलेल्या बस - 558
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 06, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ashadhi Wari 2025: ‘आषाढी वारी’साठी लालपरीच येणार घरी, ST चा मोठा निर्णय, पुण्यातून 700 बस!