Mumbai: मुंबईत मतदार यादीतला धक्कादायक प्रकार, दुबार नव्हे तब्बल 103 वेळा 4 जणांची नावं!
- Published by:Sachin S
Last Updated:
४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा बनावट मतदारांची संख्या सुमारे ११ लाख असल्याचं निष्पन्न झालं आहे.
श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी
मुंबई: राज्यभरात नुकत्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. अनेक ठिकाणी दुबार आणि बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीमध्येही घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर १०३ बार ४ व्यक्तींची नाव असलेले मतदार समोर आले आहे.
advertisement
मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत तब्बल ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली असल्याचं समोर आलं आहे. ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा बनावट मतदारांची संख्या सुमारे ११ लाख असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, ह्या दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर काम केलं जाणार आहे.
advertisement

वार्डमध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटो मतदार यादीमध्ये पडताळणी करून वॉर्डमध्ये अधिकारी- कर्मचारी पाहणी करणार आहे. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत पालिकेचे कर्मचारी बीएलओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत. सध्या १० डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट १ भरून घेतले जाणार नाही. मतदान केंद्र निहाय यादी २२ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
advertisement
हरकतीचा कालावधी वाढवून द्या, ठाकरे गट आणि मनसेची मागणी
view commentsदरम्यान, मतदार याद्यांमध्ये घोळ आणि हरकती - सूचना याबाबतचा कालावधी वाढवून देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ गेले होते. प्रत्येक वॅार्डात हजारो मतदार दुबार आहेत काहींच्या त्रृटी अजून सोडविण्यात आले नाही. त्यामुळे हरकती आणि सुचना देण्यासाठी हा कालावधी कमी पडत असून त्यात आणखी एक आठवड्यांची वाढ करावी असे पत्र देण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 10:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईत मतदार यादीतला धक्कादायक प्रकार, दुबार नव्हे तब्बल 103 वेळा 4 जणांची नावं!


