Mumbai Local: मध्य रेल्वेवर 12 दिवस खोळंबा! ट्रेनचे मार्ग बदलले, लोकल रद्द, पाहा सविस्तर

Last Updated:

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून शनिवारपासून 12 दिवस खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेवर 12 दिवस खोळंबा! ट्रेनचे मार्ग बदलले, लोकल रद्द, पाहा सविस्तर
Mumbai Local: मध्य रेल्वेवर 12 दिवस खोळंबा! ट्रेनचे मार्ग बदलले, लोकल रद्द, पाहा सविस्तर
मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील 12 दिवस खोळंबा होण्याची शक्यता असून लोकलचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे लागेल. मध्य रेल्वेवर 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत बदलापूर स्टेशन येथे गर्डर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मध्यरात्री 2 ते 3.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी मेगाब्लॉक
ठाणे-कल्याण दरम्यानचा जलद मार्ग रविवारी मेगा ब्लॉकसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या काळात अप आणि डाऊन जलद लोकल वाहतूक पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेकडे वळवण्यात येणार आहे. या बदलांमुळे काही लोकल फेऱ्या रद्द रहाणार आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्ववत सुरु राहील. बेलापूर–पनवेलदरम्यान मात्र ब्लॉक राहणार आहे.
advertisement
बदलापूरला विशेष ब्लॉक
बदलापूर स्टेशन परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान रोज मध्यरात्री 2 ते 3:30 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पादचारी पुलासाठी 37.2 मीटर लांबीचे एकूण 18 स्टील गर्डर्स उभारले जाणार आहेत. हे काम करण्यासाठी तब्बल 350 मेट्रिक टन क्षमतेची प्रचंड क्रेन तैनात केली जाणार असून संपूर्ण परिसरात रेल्वेची हालचाल अत्यंत मर्यादित असेल.
advertisement
लोकल सेवेला फटका
ब्लॉक कालावधीत लोकल सेवेवरही मोठा परिणाम होणार आहे. 12.12 ची कर्जत–सीएसएमटी लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे कर्जतहून रात्री 2.30 वाजता सुटणारी लोकल अंबरनाथ येथे थांबवून 3.10 वाजता ती सीएसएमटीसाठी मार्गस्थ होईल. अंबरनाथ–कर्जतदरम्यान या कालावधीत दोन्ही दिशेची लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहील. त्यामुळे सीएसएमटीहून कर्जतसाठी जाणाऱ्या प्रवाशांना रात्री 11:30 वाजताची लोकलच शेवटची उपलब्ध गाडी असेल.
advertisement
मध्य रेल्वेवर इथंही खोळंबा
पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामात येणाऱ्या अडथळ्यांमुळे मध्य रेल्वेने आणखी एक विशेष रात्रकालीन ब्लॉक 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान जाहीर केला आहे. हा ब्लॉक दररोज रात्री 1.30 ते 3.30 या वेळेत लागू राहील. या काळात पनवेल आणि कळंबोलीदरम्यानच्या तीन प्लॅटफॉर्म मार्गिका अप व डाऊन मार्गिका आणि इंजिन वळविण्याच्या लाईन्स पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे सुमारे 20 मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील या सलग ब्लॉकमुळे पुढील 12 दिवस प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वेवर 12 दिवस खोळंबा! ट्रेनचे मार्ग बदलले, लोकल रद्द, पाहा सविस्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement