IND vs SA 2nd Test : शुभमनला जमलं नाही पण ऋषभने उतरवलं गंभीरच्या डोक्यातलं भूत, सगळे जागेवर आणले!

Last Updated:

India vs South Africa Guwahati Test : शुभमन गिलने जी चूक केली, ती चूक ऋषभने केली नाही. तसेच आता साई सुदर्शनला देखील संघात घेऊन ऋषभने टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत केली आहे.

India vs South Africa Guwahati Test
India vs South Africa Guwahati Test
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. मैदान बदलले कॅप्टन बदलला पण टॉस वेळी पुन्हा टीम इंडियाच्या पदरी निराशाच आली. पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन्सी करताना ऋषभ पंतही टॉसवेळी कमनशिबी ठरला. ऋषभला टॉस जिंकता आला नाही. पण ऋषभने टीम इंडियामधील होणाऱ्या चुका लगेच दुरुस्त केल्या आहेत. शुभमनला जे जमलं नाही ते ऋषभने करून दाखवलं आहे.
टीम इंडियाने कोलकाता टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं. अशातच आता गुवाहाटीवर वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे शुभमन गिलने जी चूक केली, ती चूक ऋषभने केली नाही. तसेच आता साई सुदर्शनला देखील संघात घेऊन ऋषभने टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत केली आहे. गंभीरने चेंज केलेली बॅटिंग ऑर्डर ऋषभने चेंज केली आहे.
advertisement
ऋषभ पंत टीम इंडियामध्ये पुन्हा राईटी फेल्टी कॉम्बिनेशन घेऊन आला आहे. तसेच बॉलर्सवर विश्वास दाखवत साऊ सुदर्शनला टीममध्ये घेऊन बॅटिंग ऑर्डर आणखी मजबूत केली. रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर या तीन ऑलराऊंडरसोबत टीम इंडिया मैदानात उतरली आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (C), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (WK), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (C/WK), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd Test : शुभमनला जमलं नाही पण ऋषभने उतरवलं गंभीरच्या डोक्यातलं भूत, सगळे जागेवर आणले!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement