Viral Video : रेल्वे डब्यात स्वयंपाकाचा थाट; चक्क महिलेने बनवली मॅगी, सोशल मीडियावर का व्हायरल होतोय VIDEO
Last Updated:
Passenger Cooks Maggi Inside Train Coach : रेल्वेच्या डब्यात एक प्रवासी मॅगी बनवत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. भांडे आणि मॅगी घेऊन महिलेने डब्यातच स्वयंपाक केला.हा प्रकार पाहून सहप्रवासी थक्क झाले तर सोशल मीडियावर हा प्रकार चर्चेत आहे.
मुंबई : प्रवासात भूक लागल्यावर लोक साधारणपणे सोबतचा खाऊ किंवा ट्रेनमधून काहीतरी विकत घेतात. मात्र, एका महिलेने भूक भागवण्यासाठी असा हटके जुगाड केला की पाहणारे आश्चर्यात तर पडलेच शिवाय अक्षरशः पोट धरून हसू लागले. हा ट्रेनमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओध्ये काय घडलं पाहा?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक महिला तिच्या कुटुंबियासोबत प्रवास करत असते. दरम्यान सकाळची वेळ झाल्याने तिच्या कुटुंबियातील अनेकांनी नाश्तासाठी पार्सल मागवले पण या महिलेने चक्क इलेक्ट्रिकत किटलीत घेतली आणि त्यात चक्क मॅगी बनवण्यास सुरुवात केली.https://x.com/i/status/1991444609076195759
व्हायरल व्हिडिओची मध्य रेल्वेकडून दखल
मिळालेल्या माहितीनुसार, महिला ही रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत होती. ज्या डब्ब्यात प्रत्येकासाठी मोबाईल आणि लॅपटॉप चार्जरसाठी प्लग दिलेले असतात. पण महिलेनी त्याचा गैरवापर केलेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने महिलेवर कारवाई सुरु केली आहे. सध्या या महिलेचा शोध सुरु आहे.
advertisement
कारवाई का होणार?
view commentsज्या प्लॅगच्या माध्यमातून महिलेने मॅगी बनवली ते अतिशय धोकादायक होते, कारण त्यामुळे शॉटसर्किट होण्याची ही शक्यता होती. रेल्वेमध्ये असलेले हे प्लॅग फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप उपकरणांच्या चार्जिंगसाठी बनवण्यात आलेले असतात. जी घरात इलेक्ट्रिक किटली वापरतो ज्याला उच्च दाबाच्या विद्युत पुरवठ्याची आवश्यकत असते. यामुळे संबंधित महिलेवर कायद्यानव्ये कलम 147 (1) अंतर्गत मध्य रेल्वेने कारवाई सुरू केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Viral Video : रेल्वे डब्यात स्वयंपाकाचा थाट; चक्क महिलेने बनवली मॅगी, सोशल मीडियावर का व्हायरल होतोय VIDEO


