Mumbai Local Murder : आलोकच्या मृत्यूला जबाबदार कोण? 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवरच पडून होता आलोक! प्रकरणात नवा ट्विस्ट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Malad Railway Station Murder : आलोक सिंह यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्यानंतर ते 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवरच पडून होतं. त्यानंतर त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे
Mumbai Malad Railway Station Murder : मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेशाने प्राध्यापक असलेल्या आलोकवर ओंकारने हल्ला केला अन् त्यानंतर आरोपी पळून गेला. मात्र, त्यानंतर आलोक रेल्वे स्टेशनवर उतरला अन् लोकांनी त्याला मदत केली. पण रेल्वे पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आलोक रेल्वे स्टेशनवर तब्बल 45 मिनिटं होता तसेच त्याला 4.5 किलोमीटर प्रवास करून भरती करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
आलोक सिंह यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, त्यानंतर ते 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवरच पडून होतं. त्यानंतर त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आलोक सिंह यांचे काका सुनील सिंह यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आलोकला तातडीने रुग्णालयात का घेऊन गेले नाही? त्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता, असं आलोकच्या काकांनी म्हटलं आहे. रेल्वे पोलिसांनी आलोकला उपचार मिळाल्याचे सीसीटीव्ही दाखवले पण ते पुरेशे नव्हते, असं त्याच्या काकाने म्हटलं आहे.
advertisement
आलोक सिंग यांना मालाड येथील जवळच्या रुग्णालयात न नेता, गर्दीच्या वेळी सुमारे 4.5 किलोमीटर दूर असलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात का हलवण्यात आलं? या प्रश्नावर उत्तर देताना एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, कार्यपद्धतीनुसार ते रुग्णांना फक्त सरकारी रुग्णालयात दाखल करतात आणि खाजगी रुग्णालये टाळतात, कारण वैद्यकीय बिलाचा खर्च कोण उचलणार याबाबत स्पष्टता नसते. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या गैरजबाबदारपणामुळे आलोकचा जीव गेला का? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
दरम्यान, आलोकला जीवे ठार मारण्याचा आपला हेतू नव्हता, असा दावा ओंकारने पोलिसांसमोर केला आहे. ट्रेनचा वेग कमी झाल्यावर ओमकारने आलोकला एकदा चिमट्याने टोचले आणि तो पळून गेला. आलोक आपला पाठलाग करेल या भीतीने तो वेगाने पळून गेला, असंही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. आलोकच्या मृत्यूची कल्पना नव्हती आणि म्हणूनच तो दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशनवर आला, असंही त्याने सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Murder : आलोकच्या मृत्यूला जबाबदार कोण? 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवरच पडून होता आलोक! प्रकरणात नवा ट्विस्ट










