BMC Gen Z Winning List: कोणी डॉक्टर तर कोणी डिझायनर, मुंबई पालिकेत Gen Z चा आवाज घुमणार; ते 12 नगरसेवक कोण? वाचा यादी

Last Updated:

BMC Gen Z Winning List: मुंबईकरांनी तब्बल 12 'जेन-झी' म्हणजेच सर्वात तरुण पिढी नगरसेवकांना निवडून दिलं आहे.

News18
News18
मुंबई :   मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहात आता तरुणाईचा आवाज घुमणार आहे. कारण यावेळेस मुंबईकरांनी तब्बल 12 'जेन-झी' म्हणजेच सर्वात तरुण पिढी नगरसेवकांना निवडून दिलं आहे. उच्चशिक्षित डॉक्टर, एमबीए आणि डिझायनर असलेल्या या तरुण नगरसेवकांमध्ये सर्वाधिक तरुण म्हणून 22 वर्षीय काशिश फुलवरीया यांचे नाव चर्चेत आहे. घराणेशाहीपेक्षा कामाच्या जोरावर आणि आधुनिक दृष्टिकोनातून वॉर्डातील प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व तरुण सज्ज झाले आहेत. आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचे डिजिटलायझेशन करण्याचे आश्वासन या युवा लोकप्रतिनिधींनी दिले आहेत.
जेन झी अर्थात जनरेशन झेड ही तरुण पिढी सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये क्रांती घडवते जैन झी ची लोकप्रियता लक्षात मुंबई महानगरपालिकेत सर्वच पक्षांनी ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा तरुणांना निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यातील 12 जणांना निवडून आले आहेत. सभागृहात ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक असले तरी सर्वात मोठा गट मध्यमवयीनांचा आहे. मात्र, नव्या पिढीच्या या प्रतिनिधींमुळे पालिकेच्या कामकाजात नवा उत्साह आणि दृष्टिकोन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement

अवघ्या 22 वर्षी गळ्यात नगरसेवकपदाची माळ (Youngest corporator in BMC)

वॉर्ड 151 च्या नगरसेविका 22 वर्षीय कशिश फुलवारिया भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत.
या तरुण नगरसेवकांमध्ये सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणजे वॉर्ड 151 मधून निवडून आलेली कशिश फुलवारिया आहेत. त्या माजी नगरसेवक राजेश फुलवारिया यांच्या कन्या आहेत. 2017 ते 2022 या कालावधीत त्यांनी या वॉर्डचे प्रतिनिधित्व केले होते. बीएमएस पदवी घेतलेल्या काशिश सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहेत.
advertisement
वॉर्ड 80 मधून निवडून आलेल्या दिशा यादव या दोन माजी नगरसेवकांची मुलगी आहेत. व्यवसायाने दागिन्यांची डिझायनर असलेल्या दिशा स्वतःचा स्टार्टअप चालवतात. दुसरीकडे वॉर्ड 167 मधून निवडून आलेल्या डॉ. समन आझमी या होमिओपॅथिक डॉक्टर असून त्या अनुभवी नगरसेवक अश्रफ आझमी यांच्या पुतणी आणि काँग्रेस पदाधिकारी अश्रद आझमी यांच्या कन्या आहेत.

कोण आहेत ते 12 नगरसेवक? (BMC Gen Z Corporator) 

advertisement
नावपक्षवयवॉर्ड
डॉ. अदिती खुरसंगेशिवसेना29बोरिवली ईस्ट
दक्षता कवठणकरभाजप28कांदिवली वेस्ट
हैदर अली शेखकाँग्रेस28मलाड वेस्ट
अंकित प्रभूशिवसेना उबाठा29गोरेगाव ईस्ट
दिशा यादवभाजप29अंधेरी ईस्ट
रितेश रायशिवसेना29अंधेरी ईस्ट
आयेशा खानराष्ट्रवादी काँग्रस28वांद्रे ईस्ट
राजूल पाटीलशिवसेना उबाठा29भांडूप वेस्ट
निर्मिती कानडेशिवसेना25घाटकोपर ईस्ट
समन आझमीकाँग्रेस29कुर्ला वेस्ट
अपेक्षा खांडेकरशिवसेना29मानखुर्द
कशिश फुलवारियाभाजप22चेंबुर/ कुर्ला
advertisement
तरुण नगरसेवकांचा हा नवा गट फक्त नावापुरते प्रतिनिध न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारात नव्या पिढीचा आवाज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Gen Z Winning List: कोणी डॉक्टर तर कोणी डिझायनर, मुंबई पालिकेत Gen Z चा आवाज घुमणार; ते 12 नगरसेवक कोण? वाचा यादी
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement