Samruddhi Mahamarg: वाहतूक कोंडीला करा बाय-बाय! मुंबई-ठाण्यातून थेट ‘समृद्धी’ गाठता येणार, 6000 कोटींचा प्लॅन तयार

Last Updated:

Sambruddhi Mahamarg: मुंबई-ठाण्यातून आता थेट समृद्धी महामार्ग गाठता येणार आहे. लवकरच 6000 कोटींच्या खर्चातून नवा मार्ग बांधण्यात येणार आहे.

Samruddhi Mahamarg: वाहतूक कोंडीला करा बाय-बाय! मुंबई-ठाण्यातून थेट ‘समृद्धी’ गाठता येणार, 6000 कोटींचा प्लॅन तयार
Samruddhi Mahamarg: वाहतूक कोंडीला करा बाय-बाय! मुंबई-ठाण्यातून थेट ‘समृद्धी’ गाठता येणार, 6000 कोटींचा प्लॅन तयार
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार ठरत आहे. समृद्धी महामार्ग 701 किमीचा असून तो विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला राजधानी मुंबईशी जोडतो. सध्या हा महामार्ग सुरू झाला असला तरी मुंबई आणि ठाण्यातून या महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई-नाशिक महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागते. आता मात्र वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाहनधारकांना आता ठाण्यातून थेट समृद्धी महामार्ग गाठता येणार आहे.
बहुचर्चित समृद्धी महामार्ग हा भिवंडीजवळच्या आमने येथून सुरू होऊन नागपूरपर्यंत जातो. मुंबई आणि ठाणेकरांना आमने येथे पोहोचण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करावा लागतो. परंतु, या महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) ठाण्यातून थेट आमनेपर्यंत पोहोचण्यासाठी खास प्लॅन केला आहे.
advertisement
काय आहे MMRDA चा प्लॅन?
एमएमआरडीए ठाण्यातील साकेत येथून आमनेपर्यंत एका नव्या मार्गाची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. 29.10 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार असून त्यासाठी तब्बल 6000 कोटी रुपयांच्या खर्चातून त्याची बांधणी केली जाणार आहे. साकेत ते आमने दरम्यानच्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून मुंबई आणि ठाणेकरांना थेट समृद्धी महामार्ग गाठता येणार आहे.
advertisement
कसा असेल नवा मार्ग?
साकेत ते आमने मार्ग हा 29.10 किलोमीटर अंतराचा असेल. या मार्गात तीन पूल असतील. यातील पहिला पूल हा ठाणे खाडीवर असेल. तर उर्वरित दोन मोठे पूल हे उल्हास नदीवर असतील. दरम्यान, नव्या मार्गामुळे वाहन चालकांना मुंबई - नाशिक महामार्गासोबतच वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील नागरिकांची देखील वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Mahamarg: वाहतूक कोंडीला करा बाय-बाय! मुंबई-ठाण्यातून थेट ‘समृद्धी’ गाठता येणार, 6000 कोटींचा प्लॅन तयार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement