804 किलोमीटर लांब शिजला कट! वेशांतर केलं, नौदलात घसून 40 काडतूसं अन् रायफल लंपास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईतील नौदल आवारातून INSAS रायफल आणि 40 काडतुसे चोरणारे राकेश उबाला व उमेश उबाला पकडले गेले. नक्षलग्रस्त भागात विकण्याचा कट सीसीटीव्हीमुळे फसला.
प्रशांत बाग, प्रतिनिधी मुंबई: नौदलात अग्निवीर जवानाला तुझी ड्युटी संपली सांगून रायफल आणि काडतुसं घेऊन पळ काढणाऱ्या अज्ञात व्यक्ती हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर मुंबई पोलीस, नौदलाचे अधिकारी यांनी एक विशेष टीम तयार करून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन दोन संशयितांना ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
804 किलोमीटर अंतरावर आधीच कट शिजला होता. ठरल्याप्रमाणे सुरू झालं मात्र सीसीटीव्हीमुळे सगळा प्लॅन फसला आणि आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांचा प्लॅन अखेर समोर आला. मुंबईतील नौदलाच्या आवारातून रायफल आणि 40 काडतुसे चोरणारा आरोपी अखेर पकडला आहे. पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं.
नौदलाचाच फायर फायटर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली. या प्रकरणात रायफल आणि काडतुसे नक्षलग्रस्त भागात विकण्याच्या तयारीत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश उबाला आणि उमेश उबाला अशी अटक केलेल्या दोन भावांची नावे आहेत. या दोघांनी मिळून नौदलाच्या आवारातून एक INSAS रायफल आणि 40 काडतुसे चोरली होती. ही चोरी करून ते तेलंगणा राज्यातील नक्षलग्रस्त भागात जाऊन नक्षलवाद्यांना विकण्याच्या प्रयत्नात होते.
ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि इतर तपास यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान, पोलिसांनी या दोन्ही भावांना अटक केली. या घटनेमुळे नौदलाच्या कॅम्पसच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांकडून या दोन्ही सख्ख्या भावांची कसून चौकशी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 2:39 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
804 किलोमीटर लांब शिजला कट! वेशांतर केलं, नौदलात घसून 40 काडतूसं अन् रायफल लंपास