Shivsena Uddhav Thackeray : वायकरांच्या मेहुण्यानंतर ठाकरेंच्या आमदारावरही गुन्हा दाखल, निवडणूक निकालाच्या वादात नवा ट्विस्ट
- Published by:Shreyas
Last Updated:
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या आमदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केला. रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याकडे निवडणूक आयोगाच्या एनकोअर टीमला वापरायला दिलेला मोबाईल आढळला. डेटा अपलोडिंगसाठी निवडणूक आयोगाने हा मोबाईल वापरायला परवानगी दिली होती.
एकीकडे रवींद्र वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झालेला असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या आमदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी दिनांक उबाठा गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र वायकर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मतमोजणीच्या दिवशी ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती, त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी 4 ते 8 दरम्यान प्रवेश केला. त्यांच्यासोबत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. याबाबत रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2024 8:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shivsena Uddhav Thackeray : वायकरांच्या मेहुण्यानंतर ठाकरेंच्या आमदारावरही गुन्हा दाखल, निवडणूक निकालाच्या वादात नवा ट्विस्ट