Mumbai Pune Expressway: चहा मुंबईत, सकाळचा नाश्ता पुण्यात! मुंबई- पुणे प्रवास फक्त 90 मिनिटांत; सुपरफास्ट एक्सप्रेस वेला केंद्राची मंजुरी

Last Updated:

मुंबई- पुणे प्रवास बाय रोड अडीच ते तीन तासांमध्ये करता येतो. आता हाच प्रवास आणखी कमी वेळेत प्रवाशांना करता येणे शक्य झालं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसवेची घोषणा केली.

Mumbai Pune Expressway: चहा मुंबईत, सकाळचा नाश्ता पुण्यात! मुंबई- पुणे प्रवास फक्त 90 मिनिटांत; सुपरफास्ट एक्सप्रेस वेला केंद्राची मंजुरी
Mumbai Pune Expressway: चहा मुंबईत, सकाळचा नाश्ता पुण्यात! मुंबई- पुणे प्रवास फक्त 90 मिनिटांत; सुपरफास्ट एक्सप्रेस वेला केंद्राची मंजुरी
मुंबई: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहेत. मुंबई- पुणे प्रवास बाय रोड अडीच ते तीन तासांमध्ये करता येतो. आता हाच प्रवास आणखी कमी वेळेत प्रवाशांना करता येणे शक्य झालं आहे. मुंबई- पुणे प्रवास अधिकच जलद होणार असून घाटातील कायमची वाहतूक कोंडी देखील सुटणार आहे. 90 मिनिटांत पुणे गाठता येणार असून नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल.
अडीच ते तीन तासांत सामान्य परिस्थितीत होणारा हा प्रवास सुट्टीच्या दिवसांत, मुसळधार पाऊसांत किंवा अपघात घडल्यास खंडाळा घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. अशा वेळी वाहन चालकांना तासन्‌तास रस्त्यावर ताटकळत पडावे लागते आणि प्रवासाचा वेळ वाढतच जातो. या कायमस्वरूपी अडचणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक्सप्रेसवेला एक नवा, अत्यंत वेगवान आणि आधुनिक महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अटल सेतू ते पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसवे असणार आहे. याची एकूण लांबी सुमारे 130 किलोमीटर पर्यंत असणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाकांक्षी नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसवेसाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नवीन मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूच्या जवळून सुरू होऊन थेट पुणे जिल्ह्यातील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पगोटे (जेएनपीएजवळ) ते पनवेलच्या चौकदरम्यानच्या मार्गाला आधीच प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाच्या उभारणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या एक्सप्रेसवे मुळे प्रवासाचा फार वेळ वाचणार आहे.
advertisement
सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवाशांना एक्सप्रेसवेवर स्वतंत्र लेन, कमी वळणांचे डिझाइन, मजबूत पूल शिवाय आवश्यक ठिकाणी बोगदे बांधले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील धोकादायक वळणं, अपघाताची शक्यता आणि नेहमीची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 90 मिनिटांत पार करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांना या महामार्गाचा फायदा फक्त राज्यातील प्रवाशासाठीच नाही तर, इतर राज्यातही प्रवाशांना सहज प्रवास करता येणं शक्य होणार आहे.
advertisement
गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई- बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास साधारण साडेपाच तासांत शक्य होईल. प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी, ऑटोमोबाईल उद्योग, बंदराशी निगडित व्यवसाय आणि निर्यातदारांसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून, राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway: चहा मुंबईत, सकाळचा नाश्ता पुण्यात! मुंबई- पुणे प्रवास फक्त 90 मिनिटांत; सुपरफास्ट एक्सप्रेस वेला केंद्राची मंजुरी
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement