Emraan Hashmi Taskaree : विमानतळावर अभिनेत्याकडे 3 सुटकेस बॅग भरुन सोन्याची बिस्कीटं, इमरान हाशमी 'तस्करी' केसमध्ये अडकणार?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Emraan Hashmi Taskaree : नेमकी काय आहे ही भानगड? इमरान हाशमी खरंच सोन्याची तस्करी करत होता की यामागे काही वेगळेच रहस्य दडलेले आहे? चला, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या 'सिरियल किसर' इमेजसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाशमी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर तो चक्क सुटकेसभर सोन्यासोबत दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे, इमरान हाशमीकडे इतकं सोनं कुठून आलं?' असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
नेमकी काय आहे ही भानगड? इमरान हाशमी खरंच सोन्याची तस्करी करत होता की यामागे काही वेगळेच रहस्य दडलेले आहे? चला, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती.
अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये इमरान हाशमी मुंबई विमानतळावर कन्वेअर बेल्टजवळ उभा असलेला दिसत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या आजूबाजूला अनेक सुटकेसेस असून, त्या उघडल्यावर आतमध्ये चक्क सोन्याचे बिस्किटे आणि दागिने भरलेले दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं पाहून उपस्थित असलेल्यांचीही नजर खिळून राहिली. इमरान हाशमी्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण हे दृष्य पाहून अनेकांना धक्का बसला.
advertisement
या घटनेनंतर काही क्षणांतच, 'इमरान हाशमीकडे एवढं सोनं कुठून आलं?' 'तो सोन्याची तस्करी करत होता का?' अशा चर्चांना उधाण आलं. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
खरंतर इमरान हाशमीच्या सोन्याच्या या 'तस्करी'मागे एक मोठा प्रमोशन स्टंट दडलेला आहे. इमरान हाशमीची नवीन वेब सिरीज 'तस्करी' (Tuskeri) प्रेक्षकांच्या भेटीला आलीआहे. ही सिरीज स्मगलिंग आणि कस्टम्स (सीमाशुल्क) विभागावर आधारित आहे, जिथे इमरान हाशमी एका कस्टम ऑफिसरची भूमिका साकारत आहे.
advertisement
They literally used an entire conveyor belt filled with bags of gold biscuits to promote Taskaree 😭 pic.twitter.com/OmN0TKXloJ
— Dhimahi Jain (@Dhimahi11) January 16, 2026
आपल्या सिरीजची चर्चा व्हावी, यासाठी निर्मात्यांनी ही अनोखी पीआर (Public Relations) ॲक्टिव्हिटी आयोजित केली होती. विमानतळासारख्या गर्दीच्या ठिकाणी, जिथे अशा घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरतात, तिथे 'सुटकेसभर सोनं' दाखवून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न होता. (Taskaree The Smugglers Web series)
advertisement
इमरान हाशमीच्या जवळ एवढं सोनं असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच, काही तासांतच तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. लोकांना वाटलं की खऱ्या अर्थाने इमरान हाशमीला सोन्यासोबत पकडण्यात आलं आहे. मात्र, हा सिरीजच्या प्रमोशनचा भाग आहे हे स्पष्ट झाल्यावर अनेकांनी या 'क्रिएटिव्ह' मार्केटिंगचं कौतुक केलं.
Honoured to be a part of Taskaree and share the screen with my favourite @emraanhashmi ❤️🙏
Thank you so much for the opportunity @raghavjairath sir and @fridaystorytellers #taskareeonnetflix #taskaree #emraanhashmi #netflix #ahmadkabirshadan pic.twitter.com/Rmcef1Vvi5
— Ahmad Kabir Shadan (@AhmadKabirShad1) January 14, 2026
advertisement
'तस्करी' या सिरीजमध्ये इमरान एका अशा कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे, जो तस्करीचे गुन्हे उघडकीस आणतो. त्यामुळे प्रमोशनसाठी खुद्द 'तस्करी'चाच आधार घेणे, हे खूपच प्रभावी ठरले आहे. बॉलिवूड कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनसाठी नवनवीन युक्त्या शोधत असतात. इमरान हाशमी ही युक्ती सध्या तरी हिट ठरली आहे. आता 'तस्करी' ही वेब सिरीज प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 5:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Emraan Hashmi Taskaree : विमानतळावर अभिनेत्याकडे 3 सुटकेस बॅग भरुन सोन्याची बिस्कीटं, इमरान हाशमी 'तस्करी' केसमध्ये अडकणार?










